चलशिक्षा २०२२, चित्रपट, शिक्षण आणि आपण!

चित्रपट शिक्षण ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का?

मला चित्रपट बघायला खूप आवडते. मी बरीच वर्षे प्रभात चित्र मंडळाची सभासद होते. (Prabhat Chitra Mandal) आताही साधना लर्निंग सेंटर (Learners Collective – Alternative Education in Central Mumbai),मध्ये आम्ही movie club चालवितो. काही महिन्यांपूर्वी BeMe (BeMe | My Shape, My Size, I grow, I move) म्हणून बंगळूरच्या आमच्यासारख्याच शाळेच्या film club ची मी सभासद होते. शिक्षणक्षेत्रात काही वर्षे काम केल्यावर चित्रपट हे शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे मी आता ठाम विश्वासाने साांगते.

काही महिन्यांपूर्वी BeMe च्या प्रकाशचा फोन आला की Project Nomad (Sourva Dutta, Project Nomad – Making Films To Understand Learning & Education), Schoolscape (Amukta Mahapatra, www.schoolscape.org ) and Abheek Academy (Indira Raju, Abheek Academy – Alternative Educational Paradigm) मिळून एक चित्रपट महोत्सव साजरा करायचे ठरवित आहेत. केवळ हा विषय माझ्यासाठी प्रिय होता असे नाही तर सौरव आणि अमुक्ता हे दोघे माझे जिव्हळ्याचे, तसेच प्रेरणास्थान देखील आहेत, त्यामुळे उत्सुकता तर होतीच.

तरीही बरेच दिवस जाण्याबद्दल काही निर्णय होत नव्हता. हळू हळू चलशिक्षाचे (https://instagram.com/chalshiksha/) teasers येऊ लागले. पहाते तर रुपेश गेसोटा, मनीष फ्रीमन आणि इतरही काही जवळचे लोक जात होते. मग मात्र लगोलग हातपाय हलवून शाळेतील १० + वयोगटातील ९ मुले, क्षमा (पालक) आणि मी असे बंगळूरला निघाालो. 

BeMe, Bangalore

Namrata, conducting introduction circle

एक दिवस आधी आम्ही BeMe शाळेला भेट दिली. ही शाळा आमच्या खास जवळची कारण ती उभी आहे आमच्यासारखीच लोकतांत्रिकतेच्या पायावर (democratic education). तिथल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्या अडचणीत मन:पूर्वक मदत केली आहे. त्यांच्या मुलांनीे आमच्यासाठी खास स्वैपाक केला होता. आमची मुले ह्या आदरातिथ्याने अतिशय खूश झाली.

Chalshiksha 2022

Ecumanical Christan Centre इथे चित्रपट महोत्सव होणार होता. मोठी हिरवळ, आमराया, उंच घनदाट वृक्ष पुन्हा एकदा पाहून चार वर्षांपूर्वी झालेल्या IDEC 2018 (International Democratic Education Conference) ची आठवण झाली. आता तर हा परिसर अधिकच सुंदर दिसत होता. मुंबईच्या गर्दीत वाढणा-या मुलंसाठीतर असा परिसर म्हणजे एक आमंत्रण होते, आमंत्रण… हुंदडण्यासाठी, झोपाळ्यांवर झोके घेण्यासाठी, आजूबाजूच्या गोष्टी ढुंढाळण्यासाठी, मुक्त होण्यासाठी, स्वत:ला शोधण्याासाठी… अँनी, अमुक्ता, सौरव, अभिलाषा यांना भेटून खूप आनंद झाला. इंदिराशी ओळख झाली, आणि अशात-हेने तिस-या organizerशी देखील महोत्सव चालू होण्याआधीच मैत्री झाली. 🙂

ECC campus, Registration desk

खूप सारे पर्याय

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केलेलं होतं, की जणू काही गेली कित्येक वर्षं हा महोत्सव होत असावा. ६-७ निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीे आयोजित केल्या होत्या. ज्यांना खोलात जाऊन philosophy आणि त्याचे प्रात्यक्षिक ह्याचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी पुविधाम (Puvidham – Education for Sustainable Living and Rural Development), नीलबाग, The Learning Community of Auroville (tlcauroville.org) , BeMe, नई तालीम, गिजुभाई बढेकांची शाळा, Rishi Valley अशा वेगवेगळया शाळांच्या documentaries and movies होत्या.

ज्यांना केवळ सिनेमाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी Taashi and the monk, Kishan and the golden chariot, चंदा के जूते, आज school जवानु छे? असे चित्रपट होते.

ज्यांना सिनेमा बनविण्यास शिकायचे असेल त्यांच्यासाठी मॅंगलोर च्या नरेशने ३ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. Little Theatre, Bangalore च्या कलाकारांनी टागोरांच्या कथा-कवितांवर आधारित नाट्य आणि त्यानंतर नाट्यकार्यशाळा ठेवली होती. ज्यांना सिनेमा सोडून दुसरे काही करावेसे वाटत होते, त्यासाठी रुपेश गेसोटा (www.rupeshgesota.weebly.com) गणिती-खेळ घेत होता, मातीकाम, विणकाम, कलरीपटटू, आणि मनीष फ्रीमनचे (https://www.instagram.com/manishfreeman/) game-a-thon. ज्याला जे करावेसे वाटेल त्यासाठी ते.

Game-a-thon by Manish Freeman

मी काय शिकले?

पुविधामच्या मीनाक्षी आक्काचे मुलांशी परीक्षेतील अपयशामुळे येणा-या वैफल्याबद्दल, आत्महत्येच्या विचारांबद्दल बोलणे, sex education, मुलग्यांना आयुष्यात कमीतकमी एकदा पाच दिवस sanitary pads वापरायला लावणे सारेच आचंबित करणारे.

दीपा धनराज यांनी कर्नाटक शासनाच्या शिक्षकांबरोबर केलेले काम ‘Films and pedagogy’ आणि ‘Young Historians’ ह्या नावाखाली सादर केले. मुले शाळेत का जात नाहीत, ह्याचा शिक्षकांनी घेतलेला शोध त्यांच्यासाठी तर महत्वाचा होताच, पण इतर शिक्षकांसाठी देखील. आर्थिक चणचण, वयात येणा-या मुलींना दूर शाळेत पाठवायची भीती, घरच्या आणि पुस्तकी भाषेत असणारा फरक, न शिकलेल्या पालकांबद्दल कमीपणाची भावना, आणि सर्वात शेवटी शिक्षण घेतल्याानंतर मूल शेतात काम करणार का? त्याच्यायोग्य नोकरीचा हमखास पर्याय उपलब्ध असणार का, हा प्रश्न सर्वांनाच अंतर्मुख करून गेला.

शिक्षणाने खरेच सगळे प्रश्न सुटतात का?

दुस-या सत्रात ‘young historians’ ह्या video-clip मध्ये १ शिक्षक व ८/१० विद्यार्थी ह्यामधील इतिहासाच्या अभ्यासाविषयक चर्चा होती. स्वत:च्याा कुटुंबाचा इतिहास, त्यासाठी वयस्क मााणसाची प्रत्येक मुलाने घेतेलेली मुलााखत, बसवराजांच्या वेगवेगळ्या तसविरी वापरून नक्की कशावरून आपण त्यांना ओळखतो, ऐतिहासिक व्यक्तिंची चित्र कशी काढायची कोण ठरवते, त्यावरून समाजाची विभागणी-बांधणी हे निष्कर्ष काढता येऊ शकतात का? ह्या शिवााय शिक्षक मुलांना एका जुन्या पडझड झालेल्या घरामधल्याा १० वस्तू आणून देऊन त्याा कुटुंबााबद्दल निष्कर्ष काढायला मदत करतात, तेव्हाचा प्रवास… डोळे उघडविणारा होता. ह्या सगळ्या प्रक्रियेत २ गोष्टी महत्वाच्या होत्या, १. मुलांची चूक सुधारायची नाही २. त्यांना बोलताना मध्येच अडवायचे नाही. मुले ज्या त-हेने शिकली, ते आचंबित करणरे होते. शिक्षकाची नक्की भूमिका काय असावी ह्यावर प्रकाश पाडणारा.

हे वरचे अभ्यास आणि आरोहीच्या रत्नेश माथुरने (Aarohi Life Education | Open Learning Community) ‘possibilities’ ह्या सदराखाली दाखविलेल्या open learners चे प्रवास, BeMe ची film and TLC’s ‘Learning from intangibles’ ह्यामुळे मला माझ्या तत्वांची खुंटी पुन्हा हलवून बळकट करता आली. ती अशी –

  1. आपण कोणालाही काहीही शिकवू शकत नाही.
  2. शिकणा-याला स्वत:च्या मनाचा/बुद्धीचा सल्लाच तेवढा घेणे आवश्यक
  3. मुलांच्या शिकण्याच्या सामर्थ्यावर तसेच, शिकायला आयुष्याकडून मिळणा-या संधीवर ठाम विश्वाास ठेवणे

खरेतर ह्या तत्वांच्या जोरावर आम्ही साधना चालू केले, परंतु कुठेतरीे मला त्याचा विसर पडला होता.

ह्याखेरीज अजून काही उल्लेखण्याजोगी sessions म्हणजे

१. कविता रत्नाचे (The concerned for working Children) मुलांचे हक्क आणि त्यांना ऐकण्याची गरज. २. माया मेनेन यांनी २ वेगवेगळ्या शिक्षकांच्या वर्गात रेकाॅर्ड केलेल्या video clips मधून सिद्ध केलेले शिक्षण. तसेच, ३. रितिका सहानी ह्यांनी अपंग मुलांबद्दल अव्यंग मुलांमध्ये जाणीव निर्मााण करण्यासाठी हसत-खेळत राबवलेले उपक्रम.

मुलांचा प्रवास

आमच्या शाळेतील १०+ वयोगटातील मुलांसाठी तर हा खूपच मस्त उपक्रम होता. बहुधा सर्वचजण आपल्या पालकांना सोडून इतके लांब इतके दिवस पहिल्यांदाच राहत होते, प्रवास करीत होते. सर्वांना film making workshop, नाटक, मातीकाम आणि game-a-thon मध्ये सहभागी व्हायला आवडले. सगळे मनसोक्त माफिया खेळले, BeMe च्या मुलांबरोबर नवीन मैत्री केली. काहींना काही अडचणींचा सामना करावा लागला, पण अर्थात त्यातही खूप काही शिकणे समाविष्ट आहेच.

आमच्या चर्चांमधून नंतर जाणविलेल्या काही गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या मुलांनी, वेगवेगळ्या प्रसंगाातून काही ना काही शिकवण घेतली, प्रोत्साहन घेतले. काहींना इतर शाळांमधील मुले पाहुण्यांसाठी जेवण बनवितात हे आवडले, काहींना मुले ट्रीपचे planning and execution ची पूर्ण जबााबदारी घेतात ते खास वाटले. काही शाळांमध्ये मुलं शौचालयही साफ करतात हे पाहून आश्चर्य वाटले, तर आपण ह्यापैकी काय करू शकतो असा प्रश्नही मनात डोकावू लागला. काहींना काम करणा-या मुलांचे प्रश्न भेडसावू लागले, त्यांच्या हक्कासाठी आपण काय करू शकतो, असे वाटायला लागले तर काहींनी आपल्या शाळेत येणा-यांचे आतिथ्य करायचे ठरविले, आणि काहींनी पाहुणे म्हणून बााहेर गेल्यास ओळख-पाळख होण्याआधीच झाडावर चढायचे नाही असे ठरविले. 😉

निरोप

वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या उद्देशाने चलशिक्षाला आली होती. मााझ्यासारखी काही मित्र- मैत्रिणींना भेटायला, काही निरुद्देश, काही सिनेमाचे तंत्र शिकायला, काही समांतर जगात काय चालू आहे ह्या उत्सुकतेने, तर काहींना कोणी आग्रह केला म्हणून. परंतु निरोपाच्या वेळी असे वाटले की प्रत्येकाला काही ना काही गवसलं. प्रत्येकाला सहभागी झाल्याचे समाधान होते, आनंद होता. भविष्यातील चलशिक्षेचा वेध होता, त्यात छोट्यांसह संपूर्ण देशातील, परदेशातील लोकांचा समावेश व्हावा असे वाटत होते.

Closing circle

आता मी मुंबईला परततेय ती खूप सारे अनुभव, आठवणी, आमंत्रणं (देऊन-घेऊन), नवीन मैत्र बरोबर घेऊन, आणि त्याबरोबरच खुल्या शिक्षणाची तत्व माझ्यापुरती बळकट करून. Project Nomad, Schoolscape आणि Abheek अकादमीला मन:पूर्वक धन्यवाद. पुढच्यावेळी अजून मुलांना आणि त्याहीपेक्षा पालकांना घेऊन जायचे मला आताच वेध लागले आहेत.

Chalashiksha 2022, Film, Education and You!

Featured

Do you think education and films have any relationship?

I happen to be a big fan of films. I have been part of Prabhat Chitra Mandal, (Prabhat Chitra Mandal Film Enthusiast Institute, Mumbai) for many years now. At Sadhana LC (Learners Collective – Alternative Education in Central Mumbai), we run a movie club. So also, I enjoyed being part of movie club with BeMe,Bangalore (BeMe | My Shape, My Size, I grow, I move) community, Bangalore. Being a self-proclaimed educationist I strongly believe films can be a great tool for learning.

I got excited when Prakash (from BeMe) happened to mention about this film festival at Bangalore, being organized by Project Nomad (Sourva Dutta, Project Nomad – Making Films To Understand Learning & Education), Schoolscape (Amukta Mahapatra, www.schoolscape.org ) and Abheek Academy (Indira Raju, Abheek Academy – Alternative Educational Paradigm). Not just that it was about Education and Films, both topics close to my heart, but also, because of Sourav and Amukta both being good friends and inspiration.

In spite of getting excited, nothing concrete was happening in regards to planning. But as the teasers of Chalshiksha (https://instagram.com/chalshiksha/)  started to appear, it was very difficult to stand on fence and watch. A lot of friends were gathering. Finally, with bunch of 9 children from LC, Kshama (a parent), I made an entry to Chalshiksha 2022!

BeMe, Bangalore

Namrata, conducting introduction circle

A day prior we were hosted by BeMe, our guide in journey of democratic education. Their kids cooked delicious meal for us, and made a lasting impression on our kids. During reflection circle, children expressed how special they felt, and what take-aways they had from BeMe.

Chalshiksha 2022

As we arrived at the venue, lush green lawns, Mango orchards, calm and quiet and huge campus of Ecumanical Christan Centre brought back the memories of IDEC 2018. The campus appeared to be even more beautiful. For children from Mumbai, such a campus was an invitation to be free, to just run-around, explore, sit on a swing and just to be oneself. It was lovely meeting Annie, Amukta, Sourav, Abhilasha and Indira. Within no time, the third organizer had become a friend too 🙂

ECC campus, Registration desk

Options to choose from

The whole program was so wel-crafted, that it was impossible to believe it was happening for the very first time. At 6/7 different locations, different activities were going on. For those who were looking for deeper dive into philosophy, there were documentaries and movies on alternative spaces like Puvidham (Puvidham – Education for Sustainable Living and Rural Development), Neelbagh, The Learning Community of Auroville (tlcauroville.org) , BeMe, Nai Talim, Gijubhai Badheka’s school, Rishi Valley.

For those who wanted to watch movies and enjoy there was wel-curated collection of movies like – Taashi and the monk, Kishan and the golden chariot, chanda ke joote, Aaj school javanu che?

For those who were interested in trying hands on film making, Naresha had offered a 3-day course. Little Theatre of Bangalore performed and conducted a workshop to demonstrate how dramatics can contribute to education. To others who wanted something apart from films, Rupesh Gesota (www.rupeshgesota.weebly.com) was playing math games, pottery work, Sathyashree’s braiding workshop, Kallaripattu workshop-demo, traditional games and Manish Freeman’s (https://www.instagram.com/manishfreeman/) gamethon.

Game-a-thon by Manish Freeman

My learnings

Meenakshi akka’s way of talking to children about failures, suicidal thoughts, sex education, and idea of making boys wear sanitary pads for five days at least once in lifetime were amazing.

Deepa Dhanraj presented her experiments with Karnataka Govt school teachers under heading of ‘Films and pedagogy’ and ‘Young Historians’.  The govt school teachers were asked to survey for the increasing dropout rate. Their journey starting from refusal to understanding of different factors was beautifully recorded into the film. There were different issues discussed about financial challenges, safety of teenage girls walking long distances to school, gap in dialects and context of textbooks and real life, fear of being looked down upon parents by learned children. But the last question which left me thinking about the purpose of education was, once the children get educated, will they return to the farming/ family? Will there be guaranteed jobs and social respect? Or even more confused state? All these questions led to the understanding of teachers and I am sure it must have led to change in the attitude and practices in the classroom.

The other session, ‘young historians’ was a video-clip of a school teacher with a group of 8-10 children, making them understand and experience the nuances of studying history. The exercise started by making family tree and understanding history of one’s family, conducting interviews of elders in the family. Teacher also used photographs of Basavraj, famous figure, to come to the conclusion that the drawings in history may come from understanding of narrator. Basavraj’s life stories also provided opportunity to discuss about social and communal aspects. The loveliest activity was to let children discuss, debate and come to a conclusion about a family/house, from where 10 articles were brought and provided to children. Deepa expressed that the condition during this activity was 1. No child will be corrected. 2. No child will be stopped from talking. It was amazing how children brainstormed and arrived at a conclusion.

The above exercise and Ratnesh’s (Aarohi Life Education | Open Learning Community) session about possibilities, where he showed some films of open learners life journeys, BeMe’s film and TLC’s ‘Learning from intangibles’ helped me reinforce my principles.

  1. Nothing can be taught
  2. The mind must be consulted in its own growth
  3. To have complete faith in child’s ability to learn and life providing the opportunities to learn.

I had sort of forgotten it in recent past, though these were the basics with which we began Sadhana Learning Centre

The other interesting sessions were by 1.Kavita Ratna (The concerned for working Children) talked about Children’s rights to be heard. 2. Maya Menon demonsrated how to make teaching visible with the help of two video clips shot in the classroom. 3. Ritika Sahani’s celebrating diversity where she demonstrated how sensitivity towards differently abled can be brought about in easy-going, fun way.

Children’s journey

All our 10+ year old had a wonderful time. It was probably the longest time they spent away from any family member, managing themselves, travelling long distance. They enjoyed participating in film making workshop, drama, pottery and game-a-thon. They played Mafia to their hearts’ content. They enjoyed company of BeMeians. Some of them went through some emotional crisis but managed themselves very well.

A few things brought up in the reflection circles were various people inspiring them, their readiness to take up the responsibility of planning and execution of different outdoor trips, awe about children cleaning toilets in the school, and curiosity if we can do the same, knowing about hardships of working children and thought if children can do something about their own rights, being a generous host and cooking food for the guests, being aware guest and not to climb the trees without saying hi-hellos ;), being helpful in taking care of the friends, so on and so forth.

The closing circle

In the closing circle, I got to meet people who had come with different objectives in mind. Some had no agenda at all, some like me had come to meet friends (which I did to the content of my heart), some were nudged to participate, while some wanted to know whats happening in the alternative world of education. But it appeared that all were happy and wanted more Chalshiksha to come in future, spreading its wings, taking more participants, especially, young ones, going to different parts of the country, even internationally!

Closing circle

I am returning back to Mumbai, with fresh experiences, memories, reinforcements, networks, invitations and am indebted to Project Nomad, Schoolscape and Abheek, for this learning opportunity. I am looking forward to more such events to include our children and parent community at large.

Limaye Sir

I am student of Balmohan Vidyamandir, Dadar, Mumbai. In 1997 I passed 9th and started 10th std. Our school used to conduct special classes in view of board exams, called Saraav Class, meaning practice classes. Ranade Sir was in charge of Saraav classes. He called us on day one, and said, “Look, Limaye sir will take English and Sanskrit for you. But it’s your responsibility that your portion gets over. The topics may change at random, but you will have to bring him on track. After all, we need to prepare for boards.”

We did not understand why he is suggesting it that way. But we had to wait only till our first lesson with Limaye Sir. Things were enough clear then.

Long hair, settled on neck, half grey, lose wrist-watch, soda-water glasses, BEST Bus ticket folded and tugged to buttonhole of shirt, in this attire, he entered, and first comment was, “Oh, a lot of students, never mind…it will dwindle slowly!” I and my friend, Saumita, gave each other startled looks.

He kept down his bag on the table, settled himself in the wooden chair, and closed his eyes. He began in clear and perfect Marthi/English. Throughout the year, I just saw him stand up near the board and use a chalk only once. That too, when none of us could write a correct sandhi of ‘Navratr’and útsav’. It should have been “Navratryutsav” (i+u=yu)

He began with the first lesson, and as usual we opened notebooks and started taking notes. Limaye sir, with eyes closed, “What’s the use of taking notes? Once the book is lost, then blank slate. Better pay attention and try to understand and remember”. We were extremely surprised that a teacher,himself was refraining us from taking What kind of teacher is this, a thought flickered for a second.

Obviously, some were scared, some curious, and some started making fun. Someone giggled. Suddenly, eyes opened.. .’Blue shirt, come here!’ Sir roared. Of course, the blue shirt understood whom he is talking to, but he gave a confused look, started looking somewhere. A louder roar, ‘yes you, fall out!’

Goodness, we did not even know that calling someone out is also told in words, ‘fall out’. Our English was only for writing paper in exam.

After publically insulting the blue shirt, he started to the whole class, “If you expect that you would get 100 on 100 in Sanskrit after attending my class, or it will help you for merit list, forget it! Come only if you wish to learn the language”

In true sense, I do not remember what he taught for 10th std, but he opened whole new world of language, its fun, slang, accents, grammar for us. Whenever possible, he introduced us right from ancient civilizations to world wars, from Mahabharat to science and from classical music to philosophy. He nurtured curiosity.

One day, he asked someone to write Marathi barakhadi, on board. Naturally the fellow forgot ऋ and लृ. We too did not realise. Someone tried to help, but he wrote those letters after अं and अ:. Sir did not leave a chance to criticise ‘so-called’ Balmohan students and taught us the correct sequence of barakhadi उ,ऊ,ऋ,लृ, ए, ऐ . So also, how the pronunciation of ऋ is close to ‘रि’ (instead of Ru in Marathi) and that of ज्ञ like ‘ज्न्य’ (and not dny). He also taught us difference in the pronunciation of –less words and –ness words. So also words like ‘little’. We were so burdened with Marthi and the diction of English was so poor and unnecessarily clear. He was the first one to bring the awareness that English needs to be spoken in English and not Angrezi.

Famous author in Marthi literature, P.L. Deshpande, he is famous for his humorous style. But Limaye sir brought to our notice Deshpande’s  skills of observation, his insights in music and also his contribution in social work. We got to know so many things from Limaye Sir, Be it Oppenheimer’s comment, ’brighter than thousand Suns or America’s Maya’, Inca, Aztec civilizations’ or ‘Neonatologist’ is a specialist doctor looking after only new-borns. Sir’s teaching had no boundries of curriculum/ syllabus.

He used to conduct long sessions on Sunday morning from 08:00 to 12:30. Those were like being in Alibaba’s den. Whatever Ranade Sir had instructed us on day one, we forgot it categorically and happily!

I remember he had taught us Rudyard Kipling’s poem, ‘If’ (If you can keep your head…) He cited an example for one of the verses, imagine an artist invests 12 hrs in making a rangoli, only to realize the following morning that a cat has walked over it. Imagine how saddened s/he  would be. Once a topic of Marathi opened up, we had a chapter on a story called “Vijaystambh (statue of victory)”. I remember his words, “when the shadows get longer than the hight of man, be sure, the sunset  is near”. He also kept saying, ‘however great a man can be, but his foot is always on ground’.

Once the discussion went to the SSC board and its office located in sion. In Marathi, its called (Sheev). Now what is Sheev, what if someone says it Shiv (rhasv). While talking about Mahatma Gandhi, he talked about Gandhi’s father, Karamchand. This word has come from Karmachandra. Then whats the meaning of Karmachandra? While appreciating Hridaynath Mangeshkar’s music composition, he could not ignore the tiny pause which should not have skipped in the famous composition of ‘Madhu maagashi mazya sakhya, pari..’ and how the meaning changed due to that. While talking about Deenaanaath, he made us wonder why it is not Deenanath. He always told that synonyms never exist in true sense. They always have a different shade. Language becomes rich when we understand that, and apply it. E.g. Praveen and Kushal though apparently mean the same, i.e.skilled, the context of using these adjectives is different. Write from Subhashit to bad words, nothing was banned in his classes. He took us to the depths of origins of these words. Like in Sanskrit the word Parn has given birth to Paan of Marathi via Pann. He also brought to our notice the cultural differences in North and South India and socio-political reasons behind it. I still remember him telling us that a lady from Punjab, while making a dough gets a hint of attack, will leave the work and pick up the gun. And since all major battles were tackled by North Indians, the aggression and insecurity has settled in them, long time. Whereas comparatively, south part of India remained peaceful, it got an opportunity to cultivate and preserve arts.

Once he forgot to show up on Sunday morning. Later, we came to know that it was a usual phenomena. Nex Sunday, without hesitation, we told him we had waited. We also mentioned we missed his class. He apologised immediately and gave his residential phone number. Every Saturday evening, thereafter we reminded him. It was rare to find such a person who would admit his mistake in front of students and would treat them so equally. It was the first time for me too, that I was calling a teacher on phone.

He used to feel distressed by our apathy and indifference towards classical music, dance forms. He thought the TV programs based on cinema music (Superhit Muqabala) were the culprit. He often made rash comments, “Keep watching those programs. Why bother about Music or Bharat muni and his drama? Sometimes he also gave us with Horse-ride/ chair-ride punishments (Pretend that u are sitting on a horse or a chair). He was Principal of Prabhu Seminary Highschool in Girgaum, and used tell us stories of his own students there.

All the subjects were open for discussion and debate in his classes, including his own life. He told us how much he used to read as a child. And there was no restriction on what to read. He used to buy good books from Pastiwala, the way he used to spend afternoons on chowpati, looking and bright light being reflected by water, in spite of having migraine, his love for banana (and the fruit seller telling him that extra ripe bananas are sold at a higher price because people make alcohol out of it), his love for the food, and the places he knew where to eat what, his glaucoma and chance of suffering from diabetes, his fear that in old age he should not lose his vision, (ears are still ok if gone), his love for his daughter, and criticism that world thinks only mother has a soft heart, the boiling milk getting spilled every morning in his house, and his wife fighting with him (who would pay attention to milk) and finally they settling by putting a spoon in milk vessel (so also, the scientific reason, why the milk is prevented from spilling out), and his dream to have a home away from crowd in Girgaum, where he will have all his books along, and lot of peace!

I met with Dr. Hemant Vinze because of him. I continued to be in touch with him through Viinze Sir. Later, sometime, I visited his Thane house with Aniket, for wedding invitation, and then met him in my marriage. After a few years, my mother-in-law’s friend told us, she was then learning Sanskrit from him. He used to teach Raghuvansh that time. I felt like visiting him again, but it never happened.

In that tender age, it was a blessing to receive guidance and education from a teacher like Limaye Sir! I was so influenced that time; probably I could have taken literature for further studies. My didi told me, we always feel that the teacher is great, when we are in his/her influence. But that was not true. Limaye Sir’s impact never faded.

When we started our new school, I tried contacting him and telling him about the project. And 15 days back, the news hit me that he is no more.

I had preserved my 10 th std Saraav class notebook nicely. Tried to search it, but in vein. Again, I remembered Limaye Sir. “What’s preserved in brain (his favourite word is takura) is more important. What is lost with the notebook is lost ultimately!”

I bow down to Limaye sir, probably for the first and the last time! Whatever bits I could take with my tiny hands and preserve safe in my limited brain, of all the ocean of treasure he offered to me, I will keep it safe. I will cherish all the memories, forever!

लिमये सरांना सलाम!

मी बालमोहन विद्यामंदिरची विद्यार्थिनी. १९९७ साली मी इयत्ता नववीतून दहावीत गेले. सराव वर्गाची व्यवस्था तेव्हा रानडे सर बघायचे. सरावच्या पहिल्या दिवशीच त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले, “हे बघा, इंग्रजी आणि संस्कृत शिकवायला लिमये सर आहेत. पण तुमचा पोर्शन पूर्ण होईल हे तुम्ही बघायचे. विषय इथून-तिथून कुठेही जाऊ शकतो. पण, आपल्याला दहावीची परीक्षा द्यायची आहे.”

सुरुवातीला आम्हाला विशेष काही कळले नाही. मात्र पहिला क्लास झाला आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

मानेवर रुळणारे अर्धे पांढरे झालेले लांब केस, हाताला सैल घड्याळ, जाड भिंगाचा चष्मा, बसचे तिकीट शर्टाच्या काजात घडी घालून खोचलेले, असे लिमयेसर वर्गात हजर झाले. खूप मुले होती वर्गात. तर म्हणाले, “संख्या बरीच आहे तुमची. पण होईल.. कमी होईल हळू-हळू” मी आणि सौमिताने एकमेकींकडे जरा घाबरूनच पाहिले.

त्यांनी हातातली पिशवी टेबलावर ठेवली, आणि स्वत: खुर्चीवर बसले. डोळे मिटून त्यांनी अस्खलित मराठी/इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. स्पष्ट उच्चार (पोटफोड्या ष सकट). त्या सबंध वर्षात त्यांना फळ्यापाशी उभे राहून हातात खडू घेतलेले मी एकदाच पाहिले. ते सुद्धा आमच्यापैकी कोणालाही नवरात्र +उत्सव ह्याची शुद्ध संधी करता आली नव्हती. तेव्हा ‘नवरात्र्युत्सव’ (नवरात्रि + उत्सव) हा शब्द फळ्यावर लिहिण्यासाठी.

सरांनी आम्हाला पहिला धडा शिकवायला सुरुवातकेल्यावर आम्ही प्रामाणिकपणे वह्या-पेन काढून लिहायला सुरुवात केली. त्यावर (डोळे मिटूनच) त्यांनी म्हटलं, ‘काय उपयोग सगळं उतरवून घेण्याचा? वही हरवली, की पाटी कोरी!, त्यापेक्षा टकु-यात काय शिरतेय, ते जास्त महत्वाचं.’ आत्तापर्यंत निमूटपणे नोट्स लिहून घ्यायची सवय असलेल्या आम्हा मुलांना, तासाला काही लिहून न घेता लक्ष ठेवा असे सांगणारा पहिलाच शिक्षक विरळा आणि थोडा विक्षिप्तही वाटला.

अर्थातच हा शिक्षक काहींच्या भीतीचा, काहींच्या विस्मयाचा आणि काहींच्या चेष्टेचा विषय झाला. कोणीतरी मुले काहीतरी बोलून गालातल्या गालात हसली असतील, अचानक, मिटलेले डोळे उघडले, आणि ‘निळा शर्ट, इकडे ये!’ अशी गर्जना झाली. निळ्या शर्टाला नीट कळलं असेलच, पण उगाच त्याने इकडे-तिकडे पाहिले असणार, म्हटल्यावर सर अजून जोरात ओरडले, ‘येस, यू, फॉल आऊट!’ आईशप्पथ, आम्हाला त्यादिवसापर्यंत बेंचच्या बाहेर पडणे ह्याला ‘फॉल आऊट’ म्हणतात हेअजिबात माहीत नव्हते. निळया शर्टाचा जाहीर अपमान केल्यावर त्यांनी फारच स्पष्टपणे त्यांनी अख्ख्या वर्गाला सांगितले, तुम्हाला वाटत असेल की माझ्या तासाला बसल्यावर तुम्हाला १०० पैकी १००  मार्क मिळतील किंवा तुम्हाला मेरिटलिस्ट मधे यायला मदत होईल, तर तो भ्रम दूर करा. भाषा शिकायची असेल, तरच इथे येण्यात अर्थ आहे.

आणि खरोखरच, दहावीच्या दृष्टीने त्यांनी आम्हाला काय शिकवले, मला माहीत नाही, परंतु भाषा, त्यातील गमती-जमती, लहेजा, व्याकरण, उच्चार ह्याचे एक विश्व त्यांनी आमच्यासाठी खुले केले. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा प्राचीन संस्कृतींपासून महायुद्धापर्यंत, महाभारतापासून विज्ञानापर्यंत, आणि शास्त्रीय संगीतापासून तत्वज्ञानापर्यंत अनेकविध गोष्टींची ओळख करून दिली. कुतुहल जागृत केले.

एकदा त्यांनी कोणालातरी उठवून बाराखडी लिहायला लावली. त्यात अर्थातच ‘ऋ, लृ’ चा उल्लेख नव्हता. आमच्या लक्षातसुद्धा आले नाही. ज्याच्या आले, त्याने ‘अं, अ:’ नंतर लिहिले. मग आम्हाला शिस्तीत ‘बालमोहनची मुले’ म्हणून criticise करून त्यांनी उ,ऊ,ऋ,लृ, ए, ऐ हा क्रम शिकविला. ऋ चा उच्चार कसा ‘रि’ च्या जवळ जाणारा आहे, आणि ज्ञ कसा ‘ज्न्य’ सारखा आहे, तसेच  ड़ (क च्या वर्गातील अनुनासिक) ञ, चा उच्चार,   -less आणि -ness मध्ये लि आणि न कडे झुकणारा उच्चार, little चा मोठ्या खुबीने होणारा लिट्ल् असा एकत्र उच्चार,  Escape चा उच्चार ए पासून नाही तर ई पासून होतो,English मधल्या ई वर कसा जोर आहे, Data सारखा आकारान्त शब्द इंग्रजीसाठी कसा नवखा आहे, ह्या आणि अशा कितीतरी गोष्टी आमच्यासारख्या शुद्ध मराठीतून स्पष्ट इंग्रजीचे उच्चार करणा-या मुलांना त्यांनी शिकविल्या.

पु.ल. देशपांड्यांच्या विनोदी शैलीबद्दल सगळे बोलायचे, परंतु पु.लं.चे निरीक्षणकौशल्य, संगीताचे ज्ञान आणि सामाजिक जाणीव ह्याची जाणीव आम्हाला लिमयेसरांनी करून दिली. ओपनहायमरचे ‘ब्रायटर दॅन थाउजंड सन्स’ असो वा अमेरिकेच्या ‘माया इंका ॲझ्टेक्स संस्कृती’ असो किंवा नवजातशिशुच्या खास डॉक्टरला निओनेटॉलॉजिस्ट म्हणणे असो, लिमयेसरांच्या शिकविण्याला कोणत्याही अभ्यासक्रमाची मर्यादा नव्हती.

त्यांचे रविवार सकाळचे ८-१२:३० हे वर्ग जे हमखास उशिरापर्यंत चालायचे ते म्हणजे आमच्यासाठी अलिबाबाच्या गुहेत जाण्यासारखे होते. आणि आम्ही रानडे सरांनी वर्षाच्या सुरुवातीला दिलेली सूचना अत्यंत सोयिस्करपणे तसेच आनंदाने विसरून गेलो.

सरांनी आम्हाला रुडयार्ड किपलिंगची If… (If you can keep your head…) ही शिकवलेली कविता आजही आठवते. त्यात त्यांनी दिलेली उदाहरणे (समजा एखाद्याने १२-१२ तास खपून रांगोळी काढली, आणि दुस-या दिवशी पाहिले तर काय, त्यावरून एक मांजर चालत गेलेय, तर त्याला किती निराश वाटेल!) आजही स्पष्ट आठवतात. त्यांनी एकदा सहज विषय निघाला म्हणून  आम्हाला एकदा मराठीतला विजयस्तंभ हा धडासुद्धा शिकविला. त्यासंदर्भात एकदा ते म्हणाले होते, ‘जेव्हा माणसांच्या उंचीपेक्षा सावल्या लांब होऊ लागतात, तेव्हा समजावं की सूर्यास्त जवळ आलाय.’ शिवाय कोणताही मोठा माणूस, कितीही मोठ्या कारकिर्दीचा असला तरी त्याचे पाय जमिनीवरच असतात हेही सांगितले होते.

त्यांच्या तासाला – SSC board चे ‘शीव’स्थितoffice चा शी –हस्व केला तर काय अर्थ होईल, ती शींव का आहे, म. गांधींच्या नावातील करमचंद हा कर्मचंद्र कसा, (आणि म्हणजे काय) दीनांच्या नाथाचा समास होताना ‘दीननाथ’ न होता, ‘दीनानाथ’ का होते? ‘मधु मागशी माझ्या सख्या, परी..’ मधील स्वल्पविराम विसरण्याने अर्थबदल कसा होतो? समानार्थी शब्द खरे कसे समानार्थी नसतातच. ‘प्रवीण. कुशल,’ अशा पारंगतसाठी वापरणा-या शब्दांमधील सूक्ष्म छटा, अशा खूप चर्चा व्हायच्या.

तसेच त्यांनी महाभारताचा एक पाठ शिकवलेला, तोही. विधवा चा समास ‘विगत: धव: यस्या सा’ असा करायचा की ‘विविधा: धवा: यस्या सा’ असा करायचा, ‘अरेच्या’ हा केवळ उद्गारवाचक शब्द आहे की कोणत्या शिवीची सुरुवात आहे असे एरव्ही निषिद्ध असलेले विषय लिमयेसरांना वर्ज्य नव्हते.

एकदा सर सकाळच्या क्लासला यायला विसरले. नंतर कळले, की असे आधीच्या बॅचना बरेचदा व्हायचे. पुढच्या रविवारी आम्ही काहीही भीड न बाळगता त्यांना तक्रारवाचक सुरात हे सांगितले, आणि म्हटले, की आम्हाला तास चुकला त्याचे वाईट वाटले, तर लगेच सरांनी माफी मागून त्यांच्या घरचा फोन नंबर दिला, आणि शनिवारी संध्याकाळी फोन करून आठवण करायला सांगितली. इतक्या प्रामाणिकपणे इतक्या नम्रतेने विद्यार्थ्यांना वागविणारा शिक्षक विरळा, आणि मी एखाद्या शिक्षकाला तासाची आठवण करायला फोन करणे ही माझ्या आयुष्यातलीही पहिलीच वेळ.

एखाद्या शब्दाची निर्मिती कुठून झाली. पर्ण ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन पण्ण आणि मराठीत पुढे पान कसे झाले. तसेच कर्णचा कान कसा झाला, ह्या सगळ्या सुरस गोष्टी सांगत त्यांनी आम्हाला व्युत्पत्तीकोषाची ओळख करून दिली. इतकेच नाही तर उत्तर भारतात असणारा ‘so called aggressiveness, insecurity’ आणि त्याच्याऐवजी दक्षिण भारतात दिसणारी शिल्पकला ह्याचा इतिहास-राजकारण-समाजकारण ह्याच्याशी कसा संबंध आहे. पंजाबमधील बाई कणीक मळताना गरज पडली तर हातात बंदूक घेऊन स्वत:च्या संरक्षणासाठी कशी उभी राहील, आणि उत्तर भारतीयांनी परकीयांची आक्रमणे थोपविल्यामुळे दक्षिण भारतीयांना कलेच्या संगोपनासाठी, विस्तारासाठी कसा वाव मिळाला हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.

संगीताबद्दलच्या आमच्या अनास्थेला आणि अनभिज्ञतेला ते तेव्हा ‘टी.व्ही.’ वर लागणा-या सिनेमाच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला (सुपरहिट मुकाबला) कारणीभूत धरायचे. ’बघा, तासन्तास कमरा हलवत नाचण-या बायका बघा. काय संबंध तुमचा अभिजात संगीताशी, किंवा भरतमुनींच्या नाट्यांशी?’ असे खूप ओरडायचेही ते एखाद्या दिवशी. कधी कधी घोडा किंवा खुर्ची शिक्षाही मिळायची (घोड्यावर किंवा खुर्चीवर बसण्याचे नाटक करायचे.) पण फारच क्वचित. आमचा बालमोहनचा अभिमान ओसांडून वाहतोय असे दिसले की काही शालजोडीतले मिळायचे. आणि त्यांच्या प्रभू सेमिनरी शाळेतल्या मुलांच्या गोष्टीही ऐकायला मिळायच्या.

सर स्वत:बद्दलच्या गोष्टीही हातचे न राखता सांगायचे. लहानपणी कोणतीही पुस्तकं वाचायची घरून असलेली मुभा. (जर मला नीट आठवत असेल तर) अर्धशिशी असतानाही भर दुपारच्या उन्हात चकाकणा-या पाण्याकडे पहात समुद्रावर तासन्तास वेळ काढणे, भडाभडा ओकणे, रद्दीच्या दुकानातून चांगली चांगली पुस्तकं शोधून आणणं, रात्री जागून त्यांचा अभ्यास-मनन-चिंतन, त्यांचा ग्लॉकोमा, केळ्यांवरचे प्रेम (आणि केळीवाल्याकडून ज्ञानात पडलेली भर – जास्त पिकलेली केळी जास्त भावाला विकली जाणे, दारू तयार करण्यासाठी) आणि एकंदरच खवय्येगिरी – कुठे काय चांगले मिळते – त्याचबरोबर डायबेटिसची भिती, म्हातारपणी ऐकवेळ कान काम करायचे बंद झाले तरी चालेल, पण वाचनासाठी डोळे शाबूत असायलाच पाहिजेत हा आग्रह, मुलीवरचे प्रेम आणि बापाला काय हृदय नसते? असा गहन प्रश्न, त्यांच्या घरी रोज दूध उतू जाणे, लक्ष कोण ठेवणार ह्यावरून बायकोशी होणारी भांडणे, मग उपाय म्हणून दूध तापविताना त्यात चमचा घालणे, मग शास्रीय कारण की त्याने का उतू जात नाही. लवकरच गिरगांव (उच्चार अनुस्वारासहित) सोडून लांबघर घेण्याचा मनसुबा, जिथे फक्त ते, त्यांची पुस्तके आणि एकांता-शांतता. आणि अजून काय काय.

संस्कारक्षम वयाच त्यांचा एक वर्षभराचा सहवास, लाभणे, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणे, खूप महत्त्वाचे होते. मी तर साहित्य किंवा भाषा घेऊन पुढे काही शिकण्याच्याही तयारीत होते. माझी मोठी बहीण माझ्या ह्या भारून जाण्याला म्हणालेली, की ‘त्या-त्या वया सगळेच शिक्षक ग्रेट वाटतात!’ पण तसं काही नाही. लिमयेसर हे गारूड आजतागायत चांगलेच शाबूत आहे.

त्यांच्यामुळे माझी डॉ. विंझेसरांशी ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून पुढची काही वर्षं आमची बोलाचाली होती. नंतर एकदम अनिकेतबरोबर त्यांच्या वाघबीळच्या घरी लग्नाचे आमंत्रण करायला गेले, तेव्हा भेट झाली. मग लग्नात. पुढे अभिषेकच्या आईच्या मैत्रिणीकडून त्यांच्या सध्या चालू असलेल्या संस्कृतवर्गांबद्दल कळलं. पण मनात असून कधी जाणं झालं नाही.

नवीन शाळा सुरु केल्यानंतर त्यांना १-२ दा कळवायचा प्रयत्न केला, पण नीटबोलणं कधी झालं नाही. आणि  मग १५ दिवसांपूर्वी त्यांच्या जाण्याची बातमी कळली. माझी १०वी सरावची वही मी आत्ता-आत्तापर्यंत जपून ठेवलेली. ती शोध-शोध शोधली. कुठेही मिळाली नाही. आणि परत सरच आठवले. शेवटी टकु-यात जे शिरलंय तेच महत्वाचे. बाकी तर सगळं वहीबरोबर गेले.

लिमयेसरांना नमस्कार. कदाचित, हा पहिला आणि शेवटचा. पण त्यांनी जे ज्ञान दिले, जे मी माझ्या खुज्या हाताने घेऊ शकले आणि माझ्या सीमित टकु-यात साठवू शकले, ते मात्र माझ्याबरोबर सदैव राहील.

बाबांचा निरोप घेताना!

आईचा फोन आला, ‘बाबा unconscious झाले आहेत, मला काहीच सुचत नाहीये!

मी स्वैपाकात होते. ७;४५ झाले असतील. आवरून साधनाला निघायचे अशी गडबडीची वेळ.

मी एक मिनीट शांत.

तीन दिवसांपूर्वी आई म्हणालेली की त्यांना गिळायला त्रास होतोय. माझ्या मनात लगेच कॅन्सरची शंका आली.  खरं सांगायचं तर त्यांच्या सिगरेट ओढण्याचा हा परिणाम कधी ना कधी होणारच अशी माझ्यातल्या डॉक्टरची पक्की खात्री होती. त्यामुळे ‘न गिळता येणे’ हे दुसरे काही असूच शाकात नाही अशी माझी धारणा. माझ्या मित्राला मक्सूदला (कान-नाक-घसा तज्ञ) मी लगेच फोन लावला, आणि म्हटलं, ‘शक्य तितक्या सगळ्या टेस्ट लिहून दे. घराच्या बाहेर एवी-तेवी पडणार तर सगळं टेस्ट होऊ दे’. आईला पण साधारण कल्पना दिली तर ती म्हणाली की ’माझ्या मानाची पूर्ण तयारी आहे’

परंतु, २ दिवसात त्यांना बरे वाटायला लागले. मग वाटलं, जरी ताप-सर्दी-खोकला नसेल तरी एकदा कोविड चाचणी करावी का? पण आई म्हणाली, ‘अजून २ दिवस थांबू. स्कॅनिंगचा काय रिपोर्ट येतो ते पाहू. मलाही वाटलं false negative ची शक्यताआहे आता. शिवाय टेस्ट पॉजिटिव आली, तर Quarentine center ला जावे लागेल का? त्यांचे खायचे-प्यायचे किती हाल होतील? आणि शिवाय कॅन्सर डिटेक्ट झाला तर काय करायचे? तर २ दिवस थांबू आणि मग बघू.

आणि आज हा फोन, काल बरे असलेले बाबा, आता अचानक unconscious?

  मग म्हटलं तिला, ‘त्यांच्या मानेखाली उशी दे, जरा उंच कर. तोंडावर पाणी मारून पहा..’ ती म्हणाली, ‘अगं, तसं नाहीये. मला काहीच सुचत नाहीये!’ मी म्हटलं, ‘मी निघतेच लगेच. तू शेजारून कोणाला तरी बोलाव.’ एवढ्यात शेजारचा सुदीप आला म्हणून तिने फोन ठेवला.

टाळेबंदीचा काळ, त्यात लवकरात लवकर कसे पोचता येईल डोंबिवलीला त्याचा विचार डोक्यात सुरू. सासूबाईंवर मुली, स्वैपाक टाकून आवरायला घेईपर्यंत पाच मिनिटात सुदीपचा फोन. ‘काही खरे वाटत नाही, तू लगेच निघ. मी समोरच्या डॉक्टरला बोलावतोय.’

माझ्यापर्यंत निरोप तर पोचला, आता वाटतेय की त्याची जाणीव काही झालीच नाही. साधनाला येणार नाही हे रजिताला कळवायचे, काही दिवस मुलींना भेटणार नाही, शिवाय त्यांना काय सांगायचे, हे सगळे प्रश्न समोर उभे राहिले. तेवढ्यात अभिषेक म्हणाला की ‘मी येतोय, दादाची गाडी घेऊन जाऊया!’. आमची गाडी नेमकी पाणी शिरून ओली झालेली. मग मुलींची रडारड सुरू झाली, त्यांना काहीही झाले तरी साधना बुडवायचे नव्हते. सासूबाईंची तयारी होती मुलींना घेऊन जायची, पण त्यांना स्वत:ला  डायबेटीस असल्याने टॅक्सीने ये-जा करू नये असे वाटत होते. शिवाय मी जरी थोडा काळ आईबरोबर असले तरी अभिषेक परत घरी आल्यावर त्याला आयसोलेशन मध्ये रहावे लागेल का? मुली सगळे नियम पाळतील का? मग उरलेले दिवस तरी त्या कशा जाणार सेंटरला? न संपणारे प्रश्न. मला कधी एकदा घराबाहेर पडतो असे झालेले. दोन मिनिटात निर्णय घेतला, मुलींना घेऊनच जायचे बरोबर, पंधरा दिवस तिथेच रहायचे. सासू-सासरे म्हणायला लागले, मुलींना कशाला नेतेस? पण मोठी मुलगी लगेच तयार झाली. क्षणात कपाटातून हाताला लागेल ते कपडे घेऊन आली. धाकटी पटकन तयार होईना. मला खूप घाई होती. मी सांगितले, मला पुढच्या ५ मिनिटात घराबाहेर पडायचेआहे. मग तेही तयार झाली.

पुढच्या प्रवासाबद्दल मला काहीही आठवत नाही. स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे. एकावर एक फोन.

दीदी, काका, मामा, सुदीप, वृंदा, वैभव. ते सांगत होते की डेथ सर्टिफिकेट द्यायला कोणी डॉक्टर तयार नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणी देईल का? मग अजून शोधाशोध, फोनाफोनी. माझ्या बॅचमेट पैकी कोणी डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करत नव्हते. काकाचे फॅमिली डॉक्टर स्वत:च स्ट्रोकने आजारी होते. आईवडिलांची फॅमिली डॉक्टर म्हणजे मीच. आणि माझा काहीच उपयोग नाही ह्या कामात. शिवाय कोरोनाचे भय सगळीकडे, सोसायटीमध्ये, डॉक्टरांमध्ये. त्यात नेमकी बाबांची टेस्ट झालेली नव्हती. सी टी स्कॅन चा रिपोर्ट हातात आलेला नव्हता.

वैभव म्हणाला की एक डॉक्टर आहे, पण तो पैसे घेईल. आधी वाटले, घेतले तर घेतले, काम तरी होईल वेळेवर. पण नंतर मनात विचार आला, काय करतोय आपण? बरोबर करतोय का? प्रोटोकॉल पासून दूर पळतोय, की त्यांची आता टेस्ट केली तर पॉझिटिव येईल अशी भिती वाटतेय? की किती वेळ रखडायला लागेल ह्याची चिंता आहे? की सरकारी यंत्रणेवरचा दांडगा अविश्वास? का फक्त त्यांच्या देहाची अधिक हेळसांड न होता त्याला सहज अग्नी देता यावा ही निव्वळ अपेक्षा? मग मनात आलं, बाबा ह्या जागी असते, तर त्यांनी काय केले असते? त्यांनी कोणालाही नियमबाह्य पैसा दिला नसता, प्रोटोकॉलला तर ते अजिबात घाबरले नसते. म्हणाले असते, नियमात जे असेल ते करायचे, भेंXX, काय लागायचा तो वेळ लागो, आणि कष्टांचे तर काहीच नाही.

निर्णय अगदी सोपा होता. मग मेडिकल मधल्या वेगवेगळ्या ओळखीच्या लोकांना फोन करून, कोणत्या हॉस्पिटलला जायचे? बॉडी बरोबर घेऊनच जायची का आधी चौकशी करावी लागेल, नोंदणी करावी लागेल? तिथे साधारण काय होईल, कोरोनाची चाचणी करतील का? अँम्ब्युलन्स कुठून मिळवायची? हे सगळे प्रश्न.

दीदीला मधल्या वेळात कळवले, तू नाही आलीस तरी चालेल, मी आता पोहोचेनच. तिला तो पास तातडीने मिळवणे हेच महाकष्टाचे काम. काहेजण म्हणाले, डेथ सर्टिफिकेट मिळाले तर पासची गरज नाही. पण इथे त्याच्यासाठीच प्रयत्न चालू होते. मला सारखी भिती की पासाशिवाय ही निघाली, आणि मध्ये कोणी अडकविले, तर काय करेल? मामा-मामींना कळविले की ‘तुम्ही बिलकुल निघू नका नाशिकहून!’. काकूजवळच असल्याने ती लगेच पोचली. एवढ्या सगळ्यात आईशी मात्र बोललेच नाही. काय बोलणार? किंवा नेमका तेव्हाच धीर सुटायचा. आणि तसेच झाले. तोपर्यंत सगळं नीट निभावलेले मी तिच्याशी फोनवर बोलताना नेमकी हळवी झाले.

मोठ्या मुलीला तोपर्यंत कळलेच होते. धाकटीला चाहूल लागलेली पण स्पष्ट काही कळलं नव्हतं. मला रडताना पाहून तिचे प्रश्न चालू झाले. तिलाही सांगितले सगळं. मृत्यू म्हणजे काय ह्याबद्दल आमचे बोलणे झाले होते आधीही. माझी आजी गेली तेव्हा मुली लहान असल्या तरी तिचा सहवास आणि नंतरची उणीव ह्या दोन्ही गोष्टी मुलींनी अनुभवल्या होत्या. त्यामुळे ही बातमी सांगणेही कठीण नव्हते. मुलींना दु:ख होणार हे निश्चितच, पण त्यातल्या त्यात त्यांची दिवसभरापुरती काय सोय पहाता येईल, म्हणून त्यांना वर वृद्धीच्या घरी पाठवायचे ठरविले.

       पुन्हा फोन चालू. ह्या सगळ्यात रस्ता संपून गेला. गाडी पार्क केली. मी घरात गेले. मुली बाहेरच्या बाहेर वरती गेल्या. बाबांच्या चेहे-यावर नेहमी झोपल्यावर असायचे तशीच शांताता. वेदना/क्लेश ह्याचा लवलेशही नाही. काका-काकू, शेजारी, सगळे होतेच. काकाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले, की काही विधी वगैरे करायचा काही आग्रह अजिबात नाही. काही आपेक्षा नाही. मला फार बरं वाटलं. एकतर बाबा संपूर्ण नास्तिक. कोणत्याही कर्मकांडात ते कधीही नाहीत. मी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून. एवढ्या निरनराळ्या प्रश्नांमध्ये हा साधा विचारही माझ्या मनात आला नव्हता. काका आपण होऊन म्हणाल्यामुळे सगळेच सोपे झाले.

तोपर्यंत दोघातिघांकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (क.डों.म.पा.) शास्त्री हॉस्पिटलला बॉडी घेउन जायची, आणि परस्पर अंत्यविधी करायचे एवढे निश्चित झाले. आईला तसे सांगितले. अँम्ब्युलन्स बोलावली. बाकीच्या गोळा झालेल्या लोकांना सांगितले की तुम्ही आता नाही थांबलात तरी चालेल. सगळ्यांच्या मनात कोरोनाची भिती तर होतीच. अँम्ब्युलन्सवाल्यानेही सांगितले होते की मी हात नाही लावणार. मी, अभिषेक, सुदीप, वृद्धीचे बाबा आम्ही चौघांनी त्यांना अँम्ब्युलन्समध्ये ठेवले. काकाला मी म्हटलं होतं, तू घरीच थांब. बाकीच्यांनाही सांगितलं की उगाच शास्त्रीनगर हॉस्पिटलला तुम्ही येऊ नका. नसतं सगळ्यांना एक्स्पोजर नको. शिवाय तिथे किती वेळ थांबायला लागेल त्याचा अंदाज नाही.

मी स्वत: जरी ठाणे महानगरपालिकेच्या छ. शिवाजी म. हॉस्पिटलमध्ये ८ वर्ष काम केले असले, तरी ह्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रसंगात नेमकं काय करायचं, केसपेपर काढायचा का नाही? अपघात विभागात जायचं की बाह्यरुगण विभागात? काय बोलायचं? ह्याबाबत अगदीच अनभिज्ञता. रांग तर मोठी होती, पण त्यात थांबायची गरज आहे का नाही? कळत नव्हतं. मग अभिषेकला बाहेरच बाबांजवळ थांबायला सांगून, आणि मी चौकशा करत, धडपडत परंतु जास्त वेळ न दवडता डॉक्टरपर्यंत पोचले. त्यांना घडला प्रसंग सांगितला. मी डॉक्टर आहे असेही म्हटलं. त्याबरोबर त्यांनी मला थोडा वेळ थांबायला सांगितले. माझ्या आधी आलेल्यापैकी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स पेंडिंग होती. त्यांचे काम करून त्या डॉक्टरांनी लगेच मला पेपर बनवून दिला. ‘अजून कोणालातरी बोलवा’ असे सांगितल्यावर मी म्हटलें, ‘माझा नवरा आहे बाहेर उभा’. तर त्या म्हणाल्या, ‘तसे नाही, आमच्याकडे जास्त स्टाफ नाहीये, बॉडी गुंडाळायला कोणीतरी मदतीला लागेल. शिवाय त्यांना तुम्हाला घरी घेऊन जाता येणार नाही. आमची शववाहिनी आहे, पण तिथे उतरवून घ्यायलाही लोक लागतील. ड्रायवर नाही करू शकणार ते काम!’

बाहेर यऊन अभिषेकला विचारले, काय करायचे? खरं तर सुदीप, वृद्धीचे बाबा, मनीष सगळ्यांनी यायची तयारी दाखविलेली. पण अभिषेक म्हणाला आपण करू मॅनेज. शक्यतो कोणाला बोलवायला नको. डेथ सर्टिफिकेटवर मृत्यूचे कारण ‘सस्पेक्टेड कोविड१९’ आले होते. शिवाय जरी आधी नसली तरी एकदा इथे शास्त्रीनगरला आल्यावर आता कोरोना एक्स्पोजरची भिती होती.

हॉस्पिटल मधल्या एका वॉर्डबॉयने आम्हाला पॅकिंगला मदत केली. आम्हाला दोघांना अर्धी पीपीई किट्स सुद्धा दिली. पण नेमक्या तिकडच्या ३ पैकी २ शवावाहिका नादुरुस्त होत्या. सुदैवाने त्यांना ज्या अम्ब्युलन्सने आणलं होतें ती तिथेच होती. ड्रायवरही तयार झाला आणि आम्ही तिथून आपेक्षेपेक्षा कमी कष्टात, कमी वेळेत, तिथून बाहेर पडलो.

ज्या काळात स्वत:चे आई-वडील हयात असताना लोक इतरांच्या पार्थिवाला अग्नी सहसा देत नसत, त्या काळात, वयाच्या विशीपासून माझ्या वडिलांनी कित्येकांना अग्नी दिला. ‘कित्येकांच्या अंतयात्रेत ते सहभागी झाले. परंतु त्यांच्यावेळी मात्र आम्ही आगदी दोघेच जण’, असा माझ्या मनात निदान १० वेळा तरी विचार येऊन गेला.  

स्मशानात आमच्या आधी काही जण असल्यामुळे आम्हाला वेटिंग होते. शिवाय वेगळेवेगळे ५ फॉर्म भरणे, ठिकठिकाणी सह्या करणे ह्यात बराच वेळ गेला. मधल्या काळात नशिबाने दीदीला ई-पास काढून देणारा आणि गाडी मिळवून देणारा एजंट भेटला. खूप खटपट करून, पास मिळवून, मेडिकल सर्टिफिकेट मिळवून, ती आणि श्रीकांत अगदी वेळेवर स्मशानात पोचले. तिला पाहिल्यावर मात्र मला खूप रडू कोसळलं. तिला २ दिवस आधीचं काहीच न सांगितल्याचे खूपच दडपण आलं होतं मला. भलेही सगळं इतक्या आकस्मात घडेल अशी तेव्हा कल्पना नव्हती, अथवा त्यावेळी कळूनही तिने येण्याचा निर्णय घेतला नसता. परंतु माझ्याकडून मी सांगितलं नाही, ह्याबद्दल मला अपराधी वाटत होते. पण ती खूपच समंजस असल्याने तिनेच उलट मला धीर दिला. तिच्या येण्याने मला एकदम हलकं वाटलं. एकतर बाबांच्या अंतिम विधीला दोन मुली आणि दोन्ही जावई हजर, ह्यापेक्षा आधिक ते काय हवे? आणि दुसरे म्हणजे आईला सुद्धा किती बरं दोन्ही मुली जवळ असल्या तर. आणि तसं झालेही. एक तर लहान मुले घरात म्हटल्यावर सगळं वातावरण बदलतं. शिवाय मी-दीदी दोघी असल्याने आईला बरं आणि आम्हाला पुढची कामे करायलाही बरं.

आम्ही दोघी असेपर्यंत मृत्यू नोंदणीचे काम, बॅंकांची कामं होवून गेली तर बरे, म्हणून महानगरपालिकेच्या कचेरीत गेले, तर तिथे मोठी लाईन. त्या माणसाने माझ्या हातावर फॉर्म टेकविला आणि म्हणाला ‘इथे भरू नका. घरी जाऊन भरा. आणि ८ दिवसांनी या सबमिट करायला. हॉस्पिटलमधून सगळा डेटा यायला वेळ जातो तेवढा.’ मग फॉर्म घेउन घरी परत आले मी. ८ दिवसांनी परत एकदा सकाळी १०ला रांगेत उभी राहिले. जवळपास ०१:३० ला माझा तिसरा नंबर असताना लंच टाईम झाला. अजून एका तासाने कळले की २१ तारखेच्या काही नोंदी आहेत. पण अजून बाबांचा फॉर्म अपलोड नाही झाला. मग क्लार्कने सुचविले की शास्त्रीनगर हॉस्पिटलला जाऊन चौकशी करा की कधी काम होईल.

दुस-या दिवशी मग पुन्हा हॉस्पिटलला गेले. त्यांनी सांगितले की आज होईल डेटा अपलोड, उद्या  जा. तरी त्यांना, ‘नक्की आजच अपलोड करा’ अशी विनंती करून मी घरी आले. एकदा मृत्यु नोंदणी झाली की पुढची कामे आईलासुद्धा पाहता येतील. त्यामुळे मी असेपर्यंत ते काम झाले तर बरे, ही भावना.

दुस-या दिवशी आँफिस चालू होंण्याआधी लवकरच रांगेत उभी राहिले. पण माझा नंबर आला तेव्हा पुन्हा क्लार्कने सांगितले की तुमचा डेटा आलाय पण फॉर्म (हार्ड कॉपी) पोचली नाहिये. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं मी काल हॉस्पिटलला जाऊन नक्की करून आलेय, असं शक्यच नाही. तर तो म्हणाला, २-३ दिवस थांबा.  आणि नाही तर तुम्हीच हॉस्पिटलला जा, तिथून फॉर्म घेऊन या. मी म्हटलं ‘असा कसा ते माझ्याकडे देतील फॉर्म’? तर म्हणाला, ’माझे नाव सांगा!’. मग तशीच मी गेले पुन्हा हॉस्पिटलमध्ये. आणि त्या डेटा-एण्ट्री आँपरेटरला विचारलं, तर ती म्हणाली की ‘मी कालच काम केलेय, फॉर्म सुद्धा दुपारी दिलाय नेवून क.डो.म.पा. कार्यालयात!’. त्यांच्या आवक-जावक रजिस्टरला नोंद आणि सही असल्याची खात्री करून त्याचा फोटो काढून पुन्हा मी क.डों.म.पालिकेच्या आँफिसमध्ये. तिथे त्यांना फोटो दाखविल्यावर मग त्यांना फॉर्म त्यांच्याच टेबलवर इतर फॉर्म्समध्ये       मिळाला. त्यानंतर पुढच्या २० मिनिटांत मी हातात प्रिण्ट-आऊट घेऊन बाहेर पडले.

बाबांचा अनेक वर्षांचा व्यवसाय. ज्याचा आम्हाला कोणाला गंध नाही. त्यांनी म्हटलेलं की मार्च मध्ये सगळे बंद केलेले, पण कपाटंच्या कपाटं भरून फायली औसांडून वाहणा-या. जुनी जुनी कागदपत्र. काय ठेवायचे, काय आवरायचे ते पाहणं, बॅंकांची कामं, मृत्युनोंदणी अशा सगळ्या कामांमध्ये खरंतर वेळ उडून गेला. आणि आपले वडील आता आपल्यात नाहीत ह्याची जाणीव मला जवळपास तीन आठवड्यांनी व्हायला लागली. घडलेल्या घटना पुन:पुन्हा आठविल्या. काही प्रसंगात मी ‘अशी कशी वागले?’ असा विचारही मनात येतो. आपण बरेचदा आपल्या आई-वडिलांप्रमाणे असतो. काही प्रमाणात जीन्स मुळे, काही प्रमाणात घडत्या वयातील अथवा प्रदीर्घ सहवासामुळे. जरी राहणीमान बदलले, विचारसरणी बदलली, बाह्य माणसांचा, घटनांचा परिणाम झाला, तरी अंतरंगामध्ये आपण खूपसे तसेच असतो. बाबांच्या जाण्यामुळे मला ही गोष्ट परत एकदा जाणवली. बाबा एखाद्या कठीण प्रसंगी असेच वागले असते. आणि कधी उल्लेख झालेला नसला तरी त्यांना जसे अपेक्षित असते तशीच मी वागले असणार अशी माझी खात्री आहे.

Bidding goodbye to Baba!

                “Baba is not responding; I don’t know what to do!” My mother’s anxious voice on the other side of Phone.

                It was around 07:45 in the morning. I was about to finish my cooking and start for Sadhana.

                I was suddenly silent.

                Around three days back, Aai had called me, telling baba has difficulty in swallowing. First thing that came to my mind was cancer. He was chronic smoker. I had anticipated this consequence for a long time. To my medical mind, difficulty in swallowing was nothing but cancer. I immediately called Maqsood, my ENT friend. I asked him to advise all possible tests. As it is, he had to step out of the house, so better to get everything tested. When I told Aai, she said she is prepared.

                Within a couple of days, he started feeling better. Hence, I thought of getting him tested for Covid; even though there was no symptom of cough/cold/ fever. But Aai said, ‘lets wait for 2 more days. Scanning report would be out too by that time’. I thought it makes sense. Since, there was a chance of false negative test. In case if test turned out to be positive, then I had no idea whether he would be moved to quarantine center, what food he would get, and also what if cancer is detected? I thought its better to wait for 2 days and then decide.

                And, today, this phone. Baba unconscious?

                I told Aai to give him pillow, raise head end, splash water.. She said, ’Its not that. I don’t understand what to do!’ I said, ‘I am leaving right away, you call Sudeep (our neighbour)’. He reached right then.

                Lock-down time, my mind started working on how to reach the earliest. I asked my MIL to look after daughters, cooking, and I left out of kitchen. Within 5 min Sudeep called, ‘Leave immediately. I have called one doctor, but I don’t know..’

                I got the message, but guess it did not reach deep down to me at that time.

                There were so many thoughts cluttered in my mind. I had to call Rajitha to convey I won’t be able to come to Sadhana for a while. I wouldn’t be able to meet kids for a few days. What am I supposed to tell them right now? Then Abhishek said, ’I am coming. Let’s take Dada’s car!’  Just a day prior our car was drowned in water, and wasn’t working. By then kids only realized they were not going to Sadhana and so started crying. Abhishek’s mom was ready to take them there, but we weren’t. Since she was diabetic, travelling by taxi, was unnecessarily exposing out. Another thought was even if I stay with Aai, and Abhishek returns in the evening, would he have to isolate himself? Would kids follow all the rules? And in that case, they won’t get to go to Sadhana…Ever ending problems.

I was in a hurry to step out of house. I decided immediately to take kids along and stay with Aai at Dombivli for couple of weeks. My in-laws were hesitant. Ananya immediately got to her feet, grabbed some clothes, but Nandita wouldn’t budge. I was getting restless. I declared I am leaving in 5 min. Abhishek intervened, finally, Nandita gave in.

I don’t remember anything through the journey, how we started, how we reached. I was in an entirely different world then. One by one I was calling and receiving phones. Didi, Kaka, Mama, Sudeep, Vrinda, Vaibhav. Neighbours told that no doctor is ready to issue death certificate, and asked if I can get it through any of my friends. Search was on. more phone calls. I did not have any batchmate practicing in Dombivali. Kaka’s family doctor had suffered from stroke a few months prior. He was also not practicing. For small reasons now-a-days my parents used to call me, but I was of no use to issue death certificate. On top of it there was severe anxiety about Corona in neighbours and society members, as well as among doctors. Baba was not tested for it. CT scan report was pending.

Vaibhav told me about one doctor, who would possibly issue a certificate but would ask for money. My immediate action was, ‘money is not the issue, we will save on time and troubles’. But very next moment, I was surprised at the way I was thinking. Was I taking correct decision? Was I running away from protocol? Was I afraid that if tested now, he would turn positive? Or was I anxious about how much delay the procedure would do? Was it the zero confidence in governmental procedures, or was it simply my wish to do the last rituals with all due respect, without causing further pain to his body?

For a flickering moment I thought, what my father would have done, had he been in a position to take decision? Decision was so easy then. He would not have given undue money to anyone. He wouldn’t have run away from protocols. He would have done whatever fits in rules. He wouldn’t have budged by time and efforts needed to spend.

I called up some friends to understand procedure. Which hospital I need to visit, whether to take the body along, or inform officials prior? Where to arrange the ambulance from? what will be the procedure thereafter?

In the mean time I informed Didi She may not come from Pune; I was about to reach. It was extremely difficult for her to get e-pass for travel. Someone said there is no need of pass if u have death certificate. And here I was, yet to start the struggle for it. I was also afraid what if she starts without it, and gets stuck in between. Mama Mami were also informed not to try coming. Kaku had already reached. In all these difficulties, I had no courage to talk to Aai. The brave face that I had put until now, I was sure it would melt when I talk to her. It was proven true.

Ananya had already understood by now what had happened. Nandita got the glimpses listening to all the calls I was making. But she was not sure. When she saw me crying, she started with her questions, she had suppressed for so long. I told her too.  We have had a talk on Death prior. Kids were small when my aaji passed away 3 years back. But they had experienced her presence, affection and later, absence too. So, it was not difficult to tell them the reality. It was obvious that they will be very sad. I decided to send them to Vriddhi, upstairs, for whatever best can be arranged.

Calls were still on. The journey was over. Car parked. I entered inside. Girls went up. There in front of me, my father, with usual calmness on his face, like any other day when he was asleep. No evidence of pain, no trouble. Kaka, kaku, neighbours many were with Aai. Kaka told me clearly, that he had no expectations of any rituals. Thoughts about rituals had not occurred to me so far. Baba was atheist. He never participated in any rituals. The only time I remember him participating in pooja was for Didi’s and my wedding. I was following his footsteps. From my side this question about rituals never existed. And Kaka expressing it upfront made things even easy.

In the mean time, it was confirmed that the body needs to be taken to Kalyan Dombivali Municipal Corporation’s Shastri Hospital. We were not supposed to carry body back home then. I informed Aai. Ambulance came. Neighbours were told not to wait thereafter. Everyone had a subtle fear of Corona. Even ambulance driver had clearly stated he was not going to help carrying. With help of Sudeep and Vriddhi’s father, me and Abhishek carried Baba to ambulance. I asked Kaka and other two to wait in the building only. In the first place, it was sure to get exposed to Corona, even if someone so far was not exposed. In the second place we were unsure of how much time the procedure will take.

Though I had worked in Thane Municipal Corporation’s C.S.M. Hospital for over 8 years, I was completely unaware of what now needs to be done. Whether to take a case paper, where to visit, casualty or OPD, what needs to be told? There was a long queue of patients. But I did not even know if it was necessary to wait or just walk ahead. Abhishek waited outside with Baba. I reached to doctor, enquiring, asking for help. I informed whatever had happened, also told her that I am doctor. She responded with empathy, asked me to wait outside for some time, since two more prior certificates were pending prior to me. I was called in sometime. She prepared the papers and asked me to call for some more people. I told her my husband is waiting outside. She answered that there was no enough staff in the hospital to wrap and seal body, for which we would need help. Also, that we would have to go to crematorium directly. KDMC had hearse, but again, hearse driver would not be able to help us.

I asked Abhishek what to do. People were ready to come and help us. But Abhishek said we would try manage as far as possible. Thankfully, one of the wardboys provided us with PPE kit and helped us pack the body. Unfortunately, 2 out of three hearses were not working. So, we requested the same ambulance man. He agreed to come with us.

There was time when performing last rites for someone when one’s own parents were alive was considered a bad omen. In those times, Baba had taken responsibility for many distant relatives, who’s who since his 20s. He must have been present for so many funerals. And here he was, accompanied by just 2.

We had to wait in the crematorium. There was queue. Also, it took a long time to finish formalities like filling forms, signing on registers. In the meantime, Didi got the contact of some agent who managed to acquire E-pass. Didi and Shrikant both could make it just in time. When I saw them there, I could barely control my emotions. I was feeling so guilt for not letting her know that baba was not well for two days. Though nobody knew he had so less time left in his hand, nor that Didi would have decided to come immediately here. But I was not able to remove that guilt out of my heart. But she did not mind that at all. In fact, I felt so supported and strong after meeting her. In the first place I was happy that Baba had both daughters and Son-in-law for his last rites. And in the second place Aai would feel so comfortable with Didi being here with us. It happened as expected. Didi, me and 2 kids being at home, it helped Aai to cope up really fast.

As long as we were there, we thought to finish the death registration, bank and other admin works. It would help Aai later. I went to KDMC office only to receive the form. The peon there, instructed me to return to office with filled form only after 8 days, since the it would have taken a long time to finish the documentation work at hospital.  After 8 days, I stood in the que at 10 o clock in the morning. At around 1:30 in the afternoon when I was third in the queue from table, office broke for lunch. After 1 more hour I got to know that there were few cases of 21st registered, but Baba’s form was not yet uploaded. The clerk suggested to enquire at the hospital office.

The next day I went to hospital. I was informed that the form would get uploaded that day itself. I still requested to do it without fail. Very next day I was at KDMC office again. When I reached the clerk, he told me that data is uploaded but hard copy has not reached. I was shocked. When I asked them to check once again, I was told there was no need. Instead, I was asked to revisit the hospital and bring hard copy myself. It was quite unbelievable that office staff would hand me over the document, but still I gave it a try. Again, at hospital, the clerk told me that they had sent hard copy too, yesterday itself. This time I played safe. I took a photo of the despatch book where the sign of receiving clerk at KDMC was documented. This proof worked well. In next 20 min I was out with the Death Registration Certificate.

Baba had his business for last forty years. We were completely unaware of the details. Though he had wrapped up everything in month of March, there were so many files, old papers. We were clueless how to take care of it. Time flew in all these office, bank, paper work. After almost three weeks, the emotion of losing father struck me like a blow. It is yet to sink in completely. Since then I am reliving all the memories of last few weeks. Sometimes I ask myself, ’how could I do all these things?’

We are almost like our parents. Sometimes it has got to do with the genes, sometimes mere close contact for prolonged period, especially in early formative life makes us so. Though our life style changes, influence due to different people and experiences change, the inner core remains same to a great extent. I re-realised this after losing Baba. He would have behaved in a similar way in a difficult situation. And though he never mentioned in particular what he expected out of me, I am pretty sure, I did the way he wished!

From cloth to cup – My menstrual journey

I was in seventh standard then. I noticed a dark brown stain on my underwear while taking bath. My grandma (aaji) was busy in prayers nearby. When I called her to show, she just replied, ‘hmm..’ and further called my mother from outside. My mom fished an old cotton saree out of the cupboard, tore it into pieces and passed me one piece. She showed me how to tuck that in. I realized my menstruation had started. I still remember this incident vividly.

We were staying in a small 1 room kitchen house then. Aaji was very particular about when to touch and when not especially for “kitchen items and gods”. With elder sister (didi) and mom in house, I had vague idea about MC, though none told me formally. But the advertise of ‘whisper’ sanitary pads then on TV used to have blue ink. Also, friends used to discuss about impure blood getting out of body. None of these colours matched with what I had witnessed, so there was a bit confusion

But I was very happy and excited overall. I got a grown-up feeling. Most importantly, I had got a license to participate in the ‘kitchen’ gossips

I went to school that day, in great excitement and shared the news with the friend. She asked when is the Pooja now? At her house, there was a customary ritual for the girl who started menstruating because of a belief that she turns into a goddess then (receives some extra power). I wished I was born at her place, since my house did not follow any such custom. But all in all, I was also happy that my menses had started before that of my friend (Oh…look at the deep-rooted competition)

All my excitement died away the very next day. In the first place, I did not bleed much. But still, I had to wash an extra cloth. In the second place, slowly my grandma was suggesting me not to come near her, not to touch some places. It’s very painful when your freedom is compromised. My mom explained me, ‘at least no one is asking you to sit separately/ outside. You just have to refrain from going to bhagwan and aaji (grandma) because she does pooja. That’s it!’ But the fact was there was no such rule at my Nani’s house (maternal grandma) and my mom never followed it till her marriage. Then why should I? Plus, I wasn’t bothered about God. But aaji was an integral part of my life. How to stay without her? (To be truthful, it was the other way too.) Rebel is inadvertent, when you are forced to do something, that you know is wrong and irrelevant. So, I started ignoring my aaji’s instructions.

I never had stomach-aches or vomiting. So aaji never recognized on day one that I was bleeding. When she used to notice the cloth for drying, her suggestions would start. I used to go and hug her tight, and say, ‘whats the use? Already 24 hrs are gone.’ Slowly she stopped telling me altogether. My aunt used to get fever if she consumed a food cooked by menstruating woman. It is wise not to attempt solving a few puzzles.

We used to stay in a chawl with common lavatory for four houses. What to do with a piece of cloth when u squat for motion? No clue. In initial days, I forgot my cloth kept aside in lavatory. This was followed by big lecture from my didi. That was double painful.

I also wished I would use sanitary pads like didi. When I expressed it to my mom, she said, ‘you are still small!’ So I had to wait to grow little bigger. In the meantime, I sneaked through a packet of pads, read instructions, took the feel. Eventually my wait was over.

Though with readymade pad there was rest from washing. But it came with its own problems. The biggest problem for me was my ‘shyness’.

I remember, I used to feel so nervous to ask for pads to a man in medical store. One my mom was outstation. Didi too was not available. I had to face buying the pads. I went round 2-3 shops, twice. There was no female helper in any of stores. Finally, I gave up and went straight to my friend’s house.

The early pads were without sticky tape at backside. So, they used to move from place. In lying down position they were almost useless due to short length. I remember every time I used to notice stains after getting up. Invariably by end of fourth day I used to get rashes. The question of disposal was even different. Not always I used to have a big enough paper to wrap. And, if I was outside somewhere, it’s even difficult. I used to be so shy even at my aunt/cousine’s place (Those were the days when we used to spend entire vacations with uncles and aunts.) to throw them in dustbins. I remember stuffing these wrapped pads in my bags and bringing back home lot of times. Now when I think, what was the reason for the nervousness, shyness I have no answer. Because only when you feel guilty, or wrong about something then that feeling is justified. Probably, someone noticing me in ‘those’ days and feeling, ‘oh..’ about it was bothersome to me. (This too looks like my perception, Now)

Things changed upside down when I got into MBBS. Slowly and steadily all the shy feelings vanished in the air. Our friends (boys) started asking our (girls) help to take menstrual history of patients. Outside college too, I started speaking so openly, that sometimes my other friends and mom started feeling nervous. Since then I understood one thing clearly, there is a big need to talk on this subject. It is very important to tell girls and boys alike, that ‘this is normal’. Whenever the circumstances permit and question arise, there is need to go beyond judgements and discuss aloud.

During our final MBBS exam, my friend’s periods started. She forgot about it due to exam stress. Neither she was carrying pad along. What to talk to invigilator, and how to seek help? Plus, clock was ticking. Chance of missing the year due to not finishing paper was another worry. She completed her paper just like that. Later 3-4 friends just encircled her and took to hostel.

Somewhere in 2005, another friend of mine, then pursuing management course handed me a menstrual cup. He told me that ‘this is new product to be launched in India’ and requested for a review after use. I agreed. Though a doctor, feeling of something being inserted inside and carried everywhere was very odd. Also, I felt it was extremely uncomfortable then. Hence, I passed on my negative review.

While pursuing my post graduation in Miraj, I explored lots of interiors of Sangli-Miraj-Kolhapur districts. There are many religious places, Hindu temples and Jain Mandirs. Outside one mandir, I read a board, ‘menstruating females are not allowed’. For the first time it came as a big blow on my face. Till now I was under impression that, following such practices, whether to enter inside mandir or not, for any female was a personal choice. Being atheist, this question never arose for me. But here, it was direct strike on a female’s freedom. How can anyone dictate the terms to a female about where to go and where not to, just because she is menstruating? It was so difficult to control the anger. For a fleeting second, I thought, had respected mothers of these rule-makers failed to menstruate, these people would have not taken birth.

Later, I got married. Thankfully, my in-laws were very liberal. My MIL does pooja occasionally when she deems necessary. (e.g. birthdays, festivals, exams and result days). 😊She used to follow certain norms initially. But she never forced me to do anything. She followed rituals till she could manage on her own. And eventually, stopped. We have Ganapati as big family-get together occasion. I used to here my sis-in-laws discussing, ‘this time so-and-so can’t pray’. I ignored these comments in first couple of years. Then slowly started questioning. ‘But why?’ I am a person who would not advise anyone unless asked for, but in these matters, I would express my opinions, without hesitation. I started convincing to my MILs, that ‘if this is normal’ we should not follow any such norms which prevent any lady against her wishes.

If anyone asked for a tablet to adjust the menstrual date for any religious purpose, I initiated discussions and refused to give medicine.

While working for Mumbai Grahak Panchayat (MGP), that time MGP had started condemning wrong advertisements. One of the members commented that ‘too much is shown in sanitary pad advertisements. They are doing a bit too much’. I expressed my opinions against that and told her if watching these advertisements, even if make one girl shy-free to buy a sanitary pad from medical store, I would say, they are achieving something. Staying in metro-city we cannot generalise what happens all across the country. These advertises are important than the ones of food products.

After a few years, my sister started using menstrual cup, and she ‘highly recommend’ it to me. Obviously, sister’s opinions matter so much. And secondly, your friend’s 😊 My friend, too, extremely eco-friendly in practice and environment conscious, was telling me same time, that we should try using cups. Finally, she herself ordered cups for us. And here I got second time introduced to it again. This time, without any problem or discomfort.

Now its more than a couple of years that I am using cups. No rash, no infection, no leakage, No stains at night. No problem during long journeys, no disposal problems. If I am travelling during periods, I carry my boiler with me. I boil it openly, without any nervousness. I talk to women around me, taking that chance.

My curious daughters (Age 5 & 8) once observed a red spot in commode, failed to drain, and asked, ‘what is this?’ First question. I had been caught off-guard. I wrapped it up quickly, failing to give proper answer. But I was unhappy with myself. Second time, they saw cup, and asked what that was. I took a breath and told them, that girls are provided with third whole, in between 2 meant for pee and poo. And through this middle one, out comes blood, once the girl is 12-13 yrs old, for around 4 days a month.

Obviously, questions followed, does baba (father) gets it? Aaji? Aunts? Is it painful? I guess last one was very important for them. I said, sometimes people get stomach-aches. It differs for everyone. Younger one instructed me to tell her if I was in pain. I asked her what she would do. She said she will give me he stomach ache medicine (used for gases). I smiled. I wished I had a son. I could talk to him. And to his friends. I could help him first step in the journey of being sensitive and compassionate.

My journey is not restricted to ‘cloth to cup’. It’s about ‘unknown body to knowing it, and taking its care’. It’s about ‘shyness to talking aloud, looking for opportunities to discuss’. It is about ‘anger for hypocrisy to dialogue for sensitivity’. Then I remember the advertisement, where a boy in bus, offers his jacket to next girl, to wrap around waist. I dream for that wise, sensitive, responsible and happy society. I work for my dream to come true.

फडक्यापासून कपपर्यंत – माझा ‘मासिकपाळी’ प्रवास

  सातवीत असताना अंघोळ करताना चड्डीवर काळसर लाल डाग पाहिला. माझी आजी देवपूजा करत होती जवळच. तिला हाक मारून दाखविले तर ती फक्त “हं…” म्हणाले. तिने बाहेरच्या खोलीतून माझ्या आईला बोलावून घेतले. आईने कपाटातल्या जुन्या कॉटनच्या साडीचे तुकडे करून मला एक फडके दिले, ते आत कसे लावायचे ते शिकवले. माझ्या लक्षात आले की माझी पाळी सुरू झाली होती. हा प्रसंग मला आजही स्पष्ट आठवतो.

दोन खोल्यांचे घर, घरात आजीचे सोवळे-ओवळे, मोठी बहिण आणि आई आणि उत्सुकता ह्यामुळे पाळी ह्या विषयावर कोणीही काहीही न शिकवितासुद्धा मला ढोबळ अंदाज होता. पण तेव्हा TV वर व्हिस्पर च्या जाहिरातीत डाग दाखवायला निळी शाई वापरायचे. आणि मैत्रिणींमध्ये अशुद्ध रक्त शरिराबाहेर पडणे इ.इ. ऐकल्यामुळे हा काळसर डाग म्हणजे पाळी कशी हे काही नीटसे उमगले नाही.

पण खूप खूष झाले. आपण मोठ्ठे कोणीतरी असल्याची जाणीव झाली. सर्वात अधिक म्हणजे घरात खुसुर-फुसुर होणा-या gossips मध्ये हक्काची जागा मिळाल्याचा आनंद होता.

शाळेत गेल्या-गेल्या माझ्या जवळच्या मैत्रिणीला सांगितले, तर ती म्हणाली, मग आता “पूजा कधी आहे?”त्यांच्या घरी नहाण आल्यावर देवीचे रूप प्राप्त झाले म्हणून मुलीची पूजा घालायची पद्धत होती. आमच्याकडे नव्हती. मला वाटले, मी तिच्याच घरी का नाही जन्माला आले? पण मैत्रिणीआधी माझी पाळी आली, म्हणून मी खूप खूष होते, ते वेगळेच. (चढाओढीचे संस्कार किती खोलवर रुजलेले, त्याची आता जाणीव झाली.)

पण नवलाईचे नऊ दिवस एका दिवसात संपले. एकतर त्या दिवसानंतर रक्तस्राव झालाच नाही, पण फडकं मात्र धुवायचे काम वाढले. शिवाय त्यामुळे गैरसोय होती. आजी हळूहळू मला दूर व्हायलाही सांगत होती. स्वातंत्र्यावर गदा येणे हे सर्वात क्लेशकारक असते. मग आईने समजूत घातली, तरी आपल्या घरात ‘बाहेर बसायची पद्धत नाही. फक्त देवाजावळ जायचे नाही. आणि आजी पूजा-जप करते म्हणून तिच्याकडे जायचे नाही एवढेच!’ आईच्या लहानपणी तिला कधी बाहेर बसायला लागले नव्हते. माझ्या आजोळी तर काहीच शिवाशिव नव्हती. मग आपल्या घरात का? देवाजवळ न जाण्याने मला काही फरक पडत नव्हता. पण आजी तर सारखी लागायची. (खरं तर तिलाही मी लागायचे.) पण आपल्याला एखादी गोष्ट करायला भाग पाडली जातेय, जी विनाकारण, तसेच चुकीची आहे, म्हटले की लगेच बंड पुकारलेच पाहिजे. ह्या नियमाप्रमाणे मी आजीजवळ न जाण्याला चक्क धुडकावून लावले.

माझ्या काही पोटात-बिटात दुखत नसल्याने तिला पहिल्या दिवशी कळायचे नाही. फडकं वाळत घातलं की मग समजायचे. मग मी तिला म्हणायचे, आता काय उपयोग, झाले २४ तास आधीच. हळूहळू तिने मला बोलायचे सोडून दिले, आणि अशा त-हेने आमच्या घरात आधीच सौम्य असलेली शिवाशिव पूर्ण बंद झाली. माझ्या एका आत्याला पाळी चालू असलेल्या बाईने केलेला स्वयंपाक जेवला तर ताप यायचा. काही कोडी मला कधी उलगडली नाहीत.

आम्ही चाळीत रहायचो. कॉमन संडास. संडासात बसताना कापडाचं काय करायचे, हा प्रश्न. सुरुवातीच्या काळात तर मी बाजूला काढून ठेवलेलं फडकं एकदा तसेच विसरले. मोठ्या बहिणीच्या लक्षात आल्यावर चांगली झाप मिळाली. त्याचे दु:ख अजून निराळंच.

मलाही बहिणीप्रमाणे सॅनिटरी पॅड वापरायची इच्छा होती. पण आई म्हणाली, अजून लहान आहेस तू. मग आणखी मोठी व्हायची वाट. मधल्या काळात मी लपूनछपून सॅनिटरी पॅडचे घरातील पाकीट उघडून काय आणि कसे त्याचा ‘फील’ घेतला. आणि मग कधीतरी पुढे मलाही पॅड वापरायची संधी मिळाली.

दुर्दैवाने, फडकी धुवायचा प्रश्न सुटला तरी नवीन कितीतरी प्रश्न होते. सगळ्यात महत्वाचा शत्रू म्हणजे ‘लाज’

मला आठवतेय, मेडिकल दुकानातील पुरुषांकडे सॅनिटरी पॅडची विचारणा करण्यासाठी मला सुरुवातीला भयंकर लाज वाटायची. एकदा आई बाहेरगावी होती. बहिण सुद्धा घरात नव्हती. पॅड विकत आणण्याचा ‘प्रसंग’ आला. जवळपासच्या २-३ दुकानांत दोनदा चक्कर मारून एकही बाई नसल्याकारणाने मी मैत्रिणीच्या घरी गेले. सुरुवातीला पॅडच्या मागे चिकट पदार्थ लावलेला नसल्याने ते बरेचदा जागेवरून हलायचे. आडवे झाल्यावर पॅडची लांबी कमी असल्याने रात्री हमखास डाग पडायचे. चौथा दिवससंपेपर्यंत रॅश यायचा. बरं पॅड टाकून कुठे आणि कसे द्ययचे हा अजून एक प्रश्न. दर वेळी गुंडाळायला मोठा कागद असेलच ह्याची शाश्वती नाही. बाहेर कुठे असले अधिकच कठीण. मला तर एवढी शरम असायची की काका/मामा/मावशी ह्या जवळच्या नातेवाईकांच्या घरीदेखील मला ते गुंडाळलेले पॅड कच-याच्या टोपलीत टाकायला नको-नको व्हायचं (आणि तेव्हा तर सबंध सुट्टया मी त्यांच्याकडे घालवायचे.) मला आठवतेय, कितीतरी वेळा, मी अशी गुंडाळलेली पॅड दप्तरातून, पिशवीमधून घरी आणली आहेत. आता विचार केला की कशाबद्दल लाज वाटायची, कारण जर काही कमीपणाचे अथवा गैर असेल तरच लाज वाटते ना? आपल्याला कोणीतरी ‘त्या’ दिवसांत पाहील आणि ‘ओह्’ असा मनात विचार आणेल, असे वाटायचे मला, बहुधा. (हे सुद्धा माझ्याच मनाचे खेळ असतील).

MBBS ला गेल्यावर मात्र ओघाने सगळ्याच गोष्टी बदलल्या. लाज वाटणेच हळूहळू बंद झाले. बायकांच्या ‘मेन्स्ट्रुअल हिस्ट्री’ घेताना बॅच मधल्या इतर मुलांना आम्हा मैत्रिणींची गरज वाटायला लागली. आणि घरी मी इतक्या मोकळेपणाने ‘ह्या’ विषयांवर बोलायला लागल्यावर आई आणि इतरांनाच जरा कानकोंडे व्हायला लागले. पण तेव्हापासून एक मात्र नक्की कळले, की ह्या विषयावर मोकळेपणाने बोलण्याची नितांत गरज आहे. ‘हे सगळं अगदी नॉर्मल आहे’ हे मुलामुलींना जेव्हा-जेव्हा प्रसंग आणि प्रश्न येतील तेव्हा-तेव्हा कोणतीही भीड न बाळगता, सांगणे हे चूक की बरोबर ह्यापलिकडे जाऊन सांगायलाच पाहिजे.

कॉलेज मध्ये एकदा फायनल परीक्षा चालू असताना नेमकी एका मुलीची पाळी चालू झाली. परीक्षेच्या गडबडीत ती विसरली असणार. बॅगमध्ये सुद्धा पॅड नव्हतं. पर्यवेक्षकाला काय सांगणार आणि कोणाकडे कशी मदत मागणार? शिवाय पेपरला वेळ अपुरा पडून वर्ष वाया जाण्याची भिती. तिने तसाच पेपर लिहिला. आणि परीक्षा संपल्यावर ३-४ मैत्रिणी तिला कोंडाळं करून हॉस्टेलला घेउन गेल्या.

नंतर साधारण २००५ च्या सुमारास, म्हणजे माझे graduation पूर्ण झाल्यावर पण लग्नाच्या आधी माझ्या एका मॅनेजमेंटच्या मित्राने मला ‘मेनस्ट्रुअल कप’ आणून दिला. मला म्हणाला ‘नवीन प्रॉडक्ट लॉंच होतेय भारतात. जरा प्लीज वापरून रीव्ह्यू दे’. आपल्या शरीराच्या आत आपण काही insert करतोय, हे डॉक्टर असून सुद्धा मला जड गेले जरा. शिवाय त्यावेळी ते अजिबात comfortable वाटले नाही ती वेगळी गोष्ट. मी लगेच त्यावर फुली मारून माझा अभिप्राय कळविला.

Post graduation ला असताना सांगली-मिरज-कोल्हापूर परिसर खूप पाहिला. तिकडे खूप मंदिरं, हिंदु तसेच जैन सुद्धा. मंदिराबाहेर चक्क लिहिलेले, ‘मासिक धर्म चालू असलेल्या स्त्रियांना प्रवेश नाही’. मला एकदम तोंडात चपराक बसल्याची जाणीव झाली. पाळी चालू असताना मंदिरात जायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न होता. मुळात मी नास्तिक असल्याने माझ्यासाठी कोणताही प्रश्न कधीच नव्हता. पण इथे चक्क स्वातंत्र्यावर घाला घातला होता. मी अथवा कोणत्या स्त्री ने कुठे जावं/ न जावं हे इतर कोण कसे ठरविणार? आणि ज्यांनी हा नियम बनविला त्यांच्या मातांना मासिकधर्म येत नसता तर त्यांचा जन्म तरी झाला असता का मुळात?

मग पुढे लग्न झाले. सासरी सोवळे-ओवळे काही नाही. सासूबाई घरी काही महत्वाचे असले (म्हणजे वाढदिवस, परीक्षा, रिझल्ट, सणवार इ.) की देवपूजा करतात. सुरुवातीला नवरात्र मोठे असायाचे, पण माझा उत्साह पाहता, त्यांनी त्यांना झेपेल तेवढी वर्षं ते केले. मग सोडून दिले. काही जावा गणपतीत भेटल्या की ‘अमुकअमुक ला देवाला वहायचे नाहीये ह्यावेळी’ असे म्हणायच्या. पहिली दोन वर्षे मी त्यावर काही बोलले नाही. मग हळूहळू ‘असं का?’ हा प्रश्न विचारायला लागले, कधीही न मागता सल्ला न देणारी मी, ह्याबाबतीत मात्र सारखी माझी मतं मांडायला लागले. अगदी सासवांना सुद्धा ‘आपल्याला जर माहीत आहे की हे नॉर्मल आहे’ तर आपण असं काही पाळायला नको, असं हक्काने सांगायला लागले. कोणी कधी पूजेसाठी तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळी मागितली तर गोळी न देता समजावायला लागले.

मुंबई ग्राहक पंचायतीसाठी (MGP) मध्यंतरी काम करत असताना चुकीच्या जाहिरातींविरुद्ध MGP ने चळवळ सुरु केली होती. त्यांचं म्हणणं होतं की सॅनिटरी पॅडच्या जाहिराती बोकाळल्या आहेत. फारच वाईट पद्धतीने चित्रीकरण करतात. त्यावर मी सांगितले, की ह्या जाहिरातीपाहून एका जरी मुलीची मेडिकल मध्येजाऊन पॅड विकत घ्यायची लाज कमी झाली, तरी उत्तम आहे. खाद्यपदार्थांपेक्षा ह्याच जाहिराती महत्वाच्या आहेत.

 मध्यंतरी माझ्या बहिणीने ‘मेनस्ट्रुअल कप’ वापरायला सुरुवात केली. खूपच comfortable आहे हे सांगितले. बहिणीच्या मतांना जगात फार महत्व असतं. आणि दुसरं म्हणजे मैत्रिणीच्या. माझी मैत्रीण ही प्रदूषण/वातावरण ह्या बाबतीत अतिशय जागरूक. ती सुद्धा सारखं म्हणत होती की कप वापरायला पाहिजेत. मग एक दिवस तिनेच आमच्या दोघींसाठी कप मागवले. आणि ह्यावेळी मला काहीही problem आला नाही. Uncomfortable वाटले नाही.

मला कप वापरून आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ होईल. कधी रॅश नाही, जंतुसंसर्ग नाही. लीकेज नाही. रात्रीचे डाग, प्रवासाचा त्रास, pad dispose करायची पंचईत, काहीच नाही. पाळीच्या दिवसांत जर मी कुठे रहायला जाणार असेन, तर माझे कप उकळविण्याचे भांडे मी बरोबर घेऊन जाते. कोणतीही शरम न बाळगता, ते मी उकळते, वर आजूबाजूच्या बायकांना ह्याबद्दल माहिती देते.

माझ्या चौकस मुलींनी (वय ५ आणि ८) एकदा कमोड मधील न ड्रेन झालेला लाल थेंब पाहिला. ‘हे काय आहे?’ पहिला प्रश्न. त्या वेळी मी बेसावध होते. थातुरमातुर उत्तर देउन मी प्रसंग टाळला. पण मनात लगेच आले की हे काही बरोबर नाही. नंतर एकदा कप बघून प्रश्न आला, ‘हे काय?’ मग मी त्यांना सांगितले, की मुलींना शू आणि शी करण्यासाठी असलेल्या २ भोकांच्या मध्ये जे १ भोक असते, त्यातून त्या १२-१३ वर्षांच्या झाल्या की महिन्यातून ४ दिवस रक्त येते.’ ओघाने पुढचे प्रश्न आलेच. सगळ्यांना येते का? बाबाला? आजीला? मावाशी-काकू? दुखते का? इ. इ. माझ्या मते, ‘दुखते का?’ हा त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मी म्हटले, कधी-कधी पोटात दुखते, काही जणांना खूप दुखते, काहींना कमी. धाकटी लगेच म्हणाली, ‘अम्मा, तुला दुखले, तर मला सांग.’ मी विचारले, ‘काय करशील?’ तर तिचे लहान मुलांचे गॅसचे औषध असते, ते देईन म्हणाली. मला वाटले, एखादा मुलगा असता मला, आणि त्याला-त्याच्या मित्रांना असं संवेदनाक्षम बनविता आलं असतं तर किती बरं झालं असतं.

फडक्यापासून ते कपपर्यंत हा एवढाच माझा प्रवास नाही, तर अनोळखी शरीर ते त्याची जाण आणि काळजी, अत्यंत शरम ते उघडपणे आज सर्वांना सांगण्याची हिम्मत, आणि दांभिक समाजाचा राग ते संवाद असा हा प्रवास आहे.   आणि मग मला ती जाहिरात आठवली. बसमधला मुलगाशेजारच्या मुलीला आपलं जॅकेट काढून कमरेभोवती गुंडाळायला देतो, ते. मी अशा जाणत्या, तरल, संवेदनाक्षम आणि आनंदी समाजाची स्वप्नं पाहते, आणि त्यासाठी आता काम करतेय.

On a less trodden path

‘School’ is a topic so close to everyone’s heart, isn’t it? And why not? We spend more than a decade in this space, and many a times develop bonds lasting for a life time.

When we started exploring school options for our young ones, it occurred to us, that it was not an easy job, as it must had been for our parents, then. There are newspapers reviewing and grading schools, different boards and patterns like SSC, ICSE, CBSE, and new additions like IB & IG, on top of it the extracurricular scope that the schools claim to provide. It is a big confusion for new parents. But me and my husband, we sorted the issue for ourselves. We decided that we would apply only in the schools which are close-by, and which would not demand donations. Thankfully, our daughters name appeared in the list of the first school we applied to, and hence we did not even bother to fill any other form.

The school was fantastic, beyond our imagination. Unisex uniform, specific number of students in class, no hurry to begin writing, no exams, non-competitive environment, inclusive policy, involvement of parents in all the operating committees (including finance), helpers being treated with equality, everything seemed ideal. We learnt a lot from this school.

In the meanwhile, my friend handed me Daniel Greenberg’s ‘Free at last’ and told, “if ever you decide something like this(starting a school), remember you have a partner in crime”. I thought she had really gone crazy.

The story looked to be over. But, it didn’t happen that way. My niece had not settled in the school. This fact is beyond acceptance in our society. I could see the torture she and, in turn, my sister were going through. My sister-in-law had also homeschooled her daughters. I was witnessing lots of discussions and debates in this background. I was observing my own medical students in the class. I could perceive that something, somewhere was wrong. Since beginning, ‘education’ had fascinated me. I had read Tottochan and few books by Leela Patil in childhood. I went through those, again, along with Summerhill, John Holt, Daniel Greenberg and Sudbury valley school. Similarly whatever I could grab about Indian experiments in education like Nai Talim of Gandhiji, Gijubhai Badheka, J. Krishnmurthi, I read all available.

Slowly, when time came to admit my younger daughter to the school (after 4 yr) I perceived changes in our school philosophy and operations as well. There were sudden multiple resignations from leadership team, which were accepted. There was no point in staying back with the school. Then started our search for the different school. But after the first one, we could not like any other. In fact, now, every school just seemed to be the same. The decision was easy by then. We decided to withdraw kids from existing school and decided to start our own.

Of course, as I said, we already had partners. So started our weekly meeetings. We used to meet over breakfast, lunch or dinner and delve into deep discussions, debates over what each one of us thought is correct, in terms of philosophy, operations. But rather than our perception, what was good for children? What does it take o bring up the citizens of democratic nation? What should be the system? What needs to be the foundations? Should we even call the space ‘school’ or something else? Where exactly we wish to stand in the a huge spectrum of “strict regimental school” to “complete unschooling”? Finally, everyone agreed that since we are social animals, we need a learning centre, which has foundation of ‘interdependency’.

Slowly, picture started getting clearer. Through our debates which even took shape of fights sometimes, we decided we do not want any board affiliation, nor any syllabus or curriculum. There should be no subjects, standards based on age, neither teachers nor a strict timetable. No exams. The learners will take the lead in their learning. Learners will have freedom to chose what to learn, when to learn and how to learn. The role of adult is by and large just be the observer, provide resources if someone asks, be ready to learn from and with children, do networking, call different people to centre. That is it. Now was the need of materialization of our thoughts and decision, so emerged a section 8 non-profit company, ‘Learners Collective Foundation’.

Side by side, all of us were looking for such type of learning spaces/ democratic schools, all across India. Visits were being paid to ‘Jidnyasa’ at Pune, ‘Aarohi’ at Housur, ‘Be-Me’ at Bangalore, ‘Swatas’ at Mysore. The eye-opener out of all these was participation in “International Democratic Education Conference, 2018” at Bangalore. More than 600 delegates working in alternative learning spaces representing various countries across globe, not just USA/ Europe but Israel, Korea, Japan, China, Nepal had come together to share the experiences and plans of future. We understood, we are not the only ones. There exists a complete alternative world.

But the fact was, most of these schools had huge space, where kids had freedom to farm, climb on the trees, play, or just wander around. How is it possible in Mumbai? We deliberated over the possibility of moving to outskirts. But it had its own limitations. That needed a residential place, which we were not comfortable with. We decided to embrace Mumbai with all her dis/advantages. After months of search, we finally met with generous ‘Shikshan Sadhana Mandal’ trust. With their support, Sadhana Learning Centre started on 3rd of June 2019, with 5 learners in age group of 5 to 18, and 2 more above 30 (that’s us). Within a month, 1 more boy joined.

The timings in starting days was 08:30 am to 02:30 pm. But children used to refuse to go home, so we extended time till 4 o’ Clock, twice a week and till 3, on rest of the days. We, generally, start a day by browsing through news paper. Its a connection with outside world. It gives topic to initate a discussion on history/geography/civics/science. There is a playground across the lane. Kids spend an hour there, if it does not rain. In the other case, they can drench and enjoy, as many times in a day, as they get opportunity.

Usually children play throughout the day. There are times, when you can see someone engrossed in a book, practicing skating, playing synthesizer, trying hands on embroidery or crochet, creating articles with a play dough or just lying down. We adults, do different things of arts crafts, Arvind Gupta scientific toys, role plays/drama, ask questions and stir discussions, but most of the time just listen to what they say and observe.

The rule making process at centre is unique. Rules are made only when the need arises, when everyone agrees to it, and once decided, its the same for all the children and adults alike. For example, initially everyone used to eat whenever he/she felt hungry. But over a period we realised, that this way, food can not be shared, the space needs repeated cleaning, hence, the rule was set that everyone will eat together. So also, after lunch, everyone has to clean his/her utensils (Spoon, bowl, plate)

Now, you may ask when do we teach language, EVS, maths? The answer is we don’t teach anything. Still, children are learning all these throughout the day. Once, a small boy said, ‘I am vegetarian’. The discussion started on what is food, vegetarian, non-vegetarian, milk and milk products, vegan food. Then my partner took a session on ‘vegetarian egg’. Like this, we take many sessions. But it has some context. And none of the sessions are compulsory. If someone is not interested, he or she can walk away. No one feels hurt or insulted. Because, ultimately, its a learning centre. Here learners decide when to learn.

Someone might worry, the children will turn arrogant this way. But we feel that the children are more sorted, responsible when they have freedom and along with that they understand the need of order. There is another reason for this development of understanding, that is our Weekly Judiciary meeting. There are always fights, complaints, which children have to put down on paper and place in complaint box. If there is some need to set the rules, it is also verbalized in agenda. All these complaints and agenda are discussed. Everyone gets a chance to speak, address their emotions. The accused also justifies his/her side. Sometimes the facilitators can be accused too. After rounds of discussions, unanimously the decision is taken over the issue. Sometimes, there are consequences to be faced, like, closing windows at the end, setting up library cupboard, sorting waste, etc.

‘How the children will develop the understanding of social responsibilities?’ (If they do not have the habit of listening to elderly/following specific orders) Here, we believe that children learn by observations and following others. We both are extremely sensitive towards nature. We aspire to make zero waste, minimal pollution at the centre. The waste is sorted, paper-plastic if at all, cannot be utilized, it goes for recycle. My partner made a leaf-composter, via which we make compost. Everyone switches off lights and fans whenever not needed. There are various ministers, housekeeping, cleanliness, electricity, food and public relations. Everyone takes these responsibilities in turn. Fridays are open days at centre. Whenever the guests are coming, someone volunteers to take them around the place and explain them how we function. Someone enthusiastically offers them water. Through all these tasks, the children learn how to talk, how to lead, how to answer and express the opinions. We can see them socialising.

Shoe-rack in making
In-house Leaf-composter for wet waste and leaves

Early last year, we observed that the one room was getting heated up, than the rest. One of the children suggested that lets plant a big tree in front of the window. But if its to be done, it had to be on footpath. So we all went to MCGM F(North) office. The clerk at garden department directed us to write a letter and submit. An 8-yo girl wrote a letter. Back with the letter, we handed it to the lady in the office. She observed the handwritten, decorated letter on a rough page and gave us a sharp ‘is-this-a-kind-of-joke’ look. We pointed at the children. She accepted it with an unpleasant look. I thought its going to go in the dustbin. After around a fortnight, when we were thinking of writing a reminder, a person from garden department visited our centre. We were so pleased. He had actually come to check, whether such centre exists in reality. Then he asked do you have any planting ceremony? We said ‘no, we don’t want a tree for ceremony, we need it for the shade’. Then he was shown three more places on the same footpath. Later, he came back and tree was planted. The fun is, another 8-yo girl said, ‘I want to learn how to write official letter!”

Someone asked me, ‘are you not scared (about future/uncertainty)’? Fear of unknown is possible. But while coming to this decision, we were sure this is the best possible way out. We are prepared for the difficulties. So the situation doesn’t look scary to us, definitely. Sometimes, children play certain non-sensical games (according to adults) throughout the day, which makes us wonder, ‘when would they come out of this?’. But, these apparently non-sensical games have power to absorb any child, of any age, even a completely new one. So it appears that we, adults, are not equipped enough to understand the strengths of such free play. Apart from that no denial that it has a benefit of language development, conflict-resolutions, bonding, being stress-buster, honing skills of drama and diction, to name a few.

If someone has a doubt about these children’s future, then we must try and understand the world has changed entirely in last 2 decades. The doors to information are wide open. Technology is advancing everyday. It is extremely difficult for the children to concentrate their mind, be with the bookish knowledge and printed information in this world of gadgets. If we fail to evolve beyond this system of mugging up and vomiting out the information, we would be falling backwards. Lets think about ourselves. How much did we still remember what we learnt from textbooks? Is that of any use when we have some practical difficulties?

We see so many people who have taken education in one field, but are pursuing a completely different career. There are some who realise they are not happy doing the work at the age of 40. A few of them take a risk of changing their path. Rest, unfortunately, don’t even find such opportunity.

When the children are given freedom, slowly their likes, dislikes, abilities and strengths of personality can be plotted. We are planning to develop early apprenticeship program, via which they can get exposure of the world, the practical life, and experience of extrapolation of their hobbies. Certainly, they will have a clearer idea while choosing their profession. They will be better prepared for the hard-work to achieve what they wish to, since, it will be their own decision. Not of someone else’s.

If at all, any of the children, wish to become doctor/engineer (any profession which will need licensing), there is always an option of appearing for direct 10th or 12th standard examination through NIOS or IGCSE. But before preparing for the exam, at least they will have clarity about the its purpose.

The journey has begun. We, especially the children, are very happy. It looks like their true education has started. Its a pleasurable experience to watch them learning through different experiences. Yes, this is a less-trodden path. But, the beauty and fun is walking on the path like this, leaving highway aside, enjoying and experiencing the world in true sense. Isn’t it?

वेगळ्या वाटेने चालताना

‘शाळा’ हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, नाही का? जवळपास एक तपाएवढा काळ आपण ज्या वास्तूत घालवितो आणि काही जणांशी आयुष्यभराचे मैत्रीचे नाते दृढ करतो, त्याचे महत्व कसे काय कमी असू शकेल?

खरं तर पालक म्हणून जेव्हा आम्ही आमच्या मुलींसाठी शाळा शोधायला सुरुवात केली त्यावेळी लक्षात आले की शाळेत दाखला घेणे ही गोष्ट (आपल्या पालकांसाठी जेवढी सोपी असावी तेवढी) सोपी नक्कीच राहिली नाही. विविध वर्तमानपत्रांतून येणारी शाळांची वर्गवारी, SSC, ICSE, CBSE, भरीत भर म्हणून इंटरनॅशनल बोर्ड, अभ्यासाव्यतिरिक्त मिळणा-या सुविधा, ह्या सर्व गोष्टींनी नवीन पालकांचा खूप गोंधळ उडतो. आम्ही मात्र ह्या कशालाही बळी न पडता घराच्या जवळची आणि देणगी न घेणारी ह्या दोन कसोट्यांवर उतरणारी शाळा पाहिली, आणि फॉँर्म भरलेल्या पहिल्याच शाळेच्या यादीत मुलीचे नाव पाहून पुढील कष्ट वाचल्याचे समाधान मानले. परंतु, ती शाळा आमच्या कल्पनेपलिकडे आम्हाला आवडली. मुला-मुलींना सारखाच गणवेष, प्रत्येक वर्गात ठराविक मुले, लिखाण खूप उशिरापर्यंत न सुरु करणे, परीक्षा नाहीत, स्पर्धा नाहीत, इतर कर्मचारी वर्गाला समानतेची वागणूक, पालकांचा सर्व ठिकाणी (फी ठरवायला सुद्धा) सहभाग, ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला खूप काही शिकवले.

मध्यंतरात माझ्या मैत्रिणीने Daniel Greenberg चे ‘Free at last’ हातावर टेकविले आणि डोळा मिचकावून म्हणाली, ‘चुकून-माकून जर तू असे काही करायचे (वेगळी शाळा काढायचे) ठरविलेस तर लक्षात ठेव की अजून एक वेडी ह्या पापात सहभागी व्हायला तयार आहे. मी मनात म्हटलं ही तर खरंच डोक्यावर पडलिये.

ही गोष्ट इथेच संपल्यासारखी वाटली तरी तसे काही झाले नाही. माझी भाची शाळेत न रुळल्याने, आणि ही गोष्ट आपल्या समाजात भयंकर अपराधाची समजली गेल्याने तिची आणि पर्यायाने माझ्या बहिणीची चाललेली ससेहोलपट मी जवळून पहात होते. तसेच माझ्या एका नणंदेने मुलींना homeschooling करण्याचा घेतलेला निर्णय, त्या निमित्ताने रंगणा-या चर्चाही मी अनुभवत होते. माझ्या स्वत:च्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचे निरीक्षण करत होते. विचार करत होते की कुठेतरी काहीतरी चुकतेय, पण काय ते नीटसं उमगत नव्हतं. मला स्वत:ला शिक्षण ह्या विषयाबद्दल फार कुतुहल होते. लहानपणी तोत्तोचान-लीला पाटील यांची काही पुस्तकं वाचनात आलेली. ती, तसेच Summerhill , Daniel Greenberg आणि Sudbury Valley School ची सगळी पुस्तकं, ह्या निमित्ताने पुन्हा वाचली. गांधीजींचे नई तालिम चे प्रयोग, गिजूभाई बढेका, जे कृष्णमूर्ती, एकलव्य प्रकाशन, बॅनियन ट्री प्रकाशन, जे काही शिक्षण – त्यातील नवे प्रयोग ह्याबद्दल मिळेल ते सगळं वाचून काढले.  

हळूहळू आमच्या धाकट्या मुलीच्या शाळेत घालण्याचे दिवस आले आणि (म्हणजे साधारण ४-५ वर्षांनी) आमच्या शाळेचे वातावरण-तत्व-ओघाने इतरही गोष्टी बदलू लागल्या. त्या इतक्या थरापर्यंत बदलल्या की एकाच वेळी शाळेच्या मुख्य ६ पदाधिक-यांनी राजीनामे सादर केले, दुर्दैवाने ते स्वीकारण्यात आले. आणि आमच्या लक्षात आले की इथे राहणे काही बरोबर नाही. मग सुरु झाला इतर शाळांचा शोध. परंतु ह्या शाळेनंतर आम्हाला इतर कोणतीही शाळा आवडेना. एवढेच नाही तर सर्व शाळा इथून-तिथून सारख्याच वाटू लागल्या. निर्णय सोपा होता. आपोआपच ठरलं की मुलींना शाळेतून काढायचे. एवढंच नाही तर आपली अशी वेगळी शाळा सुरु करायची.

अर्थात वर सांगितल्याप्रमाणे आमच्यासारखे काही वेडे पार्टनर्स होतेच आमच्याबरोबर. दर आठवड्याला मीटिंग्ज. चर्चांवर चर्चा. मला काय बरोबर वाटते, तुला काय बरोबर वाटते, त्यापेक्षा मुलांसाठी काय योग्य? आपल्याला सुजाण नागरिक तयार करायचे असतील तर काय करायला पाहिजे? आपल्या शाळेला ‘शाळा’ म्हणायचे? का ते ही नाही? काय तत्व असावी, काय व्यवस्था असावी? Strict, regimental school पासून complete unlearning असा एक मोठा spectrum विचारात घेऊन आपल्याला ह्यात नेमके कुठे स्थान पक्के करायचे ह्याबद्दल खूप खल झाले. पण एक मात्र नक्की होते की आपण समाजात राहणारे प्राणी असल्याने, स्वावलंबन किंवा परावलंबनापेक्षा “importance of interdependency” ठासविण्यासाठी अनेक मुलांना एकत्र शिकता येईल असे केंद्र सुरु करायचे.

एकमेकांशी भांडता-भांडता, मनात द्वंद्व खेळता-खेळता आम्हाला उमगले आम्हाला काय नको आहे. आम्हाला  कोणतेही बोर्ड, पाठ्यक्रम (syllabus किंवा curriculum), साचेबद्ध वेळापत्रक, विषय, इयत्ता, शिक्षकाच्या भूमिकेत वावरणारी माणसे, शिकविण्याची प्रक्रिया, परीक्षा इ. इ. काही नको. मुलांनी त्यांना काय पाहिजे ते शिकायचे, जर विचारले तरच मोठ्यांनी मदत करायची, मुलांना प्रेरणा मिळतील अशा विविध गोष्टी करायच्या, मुले काय करतात ते उघड्या डोळ्यांनी पहायचे, निरीक्षणे नोंदवून ठेवायची, सदैव शिकण्याची तयारी ठेवायची. ह्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आम्ही Section 8 company काढली. Learners Collective Foundation.

मग भारतभरात कुठे वेगळ्या प्रकारच्या शाळा (ज्यांना democratic schools किंवा Self-directed learning centre असे म्हणतात) आहेत त्याच्या शोधाला सुरुवात झाली. पुण्याची ‘जिज्ञासा’, होसूरची ‘आरोही’, बंगळूरची ‘बी-मी’ ह्या शाळांना भेटी दिल्या. बंगळूर मध्ये झालेल्या २०१८ च्या International Democratic Education Conference मध्ये सहभागी झाल्यावर तर आम्ही आवाक् झालो. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स सारख्या देशांतच नाही तर नेपाळ, इस्राएल, कोरिया, जपान, चीन अशा विविध देशांमधून Democratic Education चालविणारे ६०० हून अधिक प्रतिनिधी तेथे हजर होते. आपले अनुभव सांगत होते.

परंतु अशा बहुतेक शाळांकडे खूप मोठी, मोकळी जागा होती; जिथे मुले झाडांवर चढू शकतील, हुंदडू शकतील, शेतीचे प्रयोग राबवू शकतील. पण मुंबईत ही चैन कशी परवडणार? मग मुंबईबाहेर जाण्याचा विचार एकदा मनात आला. पण निवासी शाळा तर काढायची नव्हती. कारण जेवढे शिक्षण शाळेत मिळते तेवढेच घरी मिळते. म्हणून मुंबईच्या गुण-दोषांसह तिला आपले मानायचे ठरविले. खूप शोधाअंती ‘शिक्षण साधना मंडळाने’ दिलेल्या पाठिंब्याने आमच्या ‘साधना लर्निंग सेंटर’चा ३ जून रोजी श्रीगणेशा झाला. पाच ते दहा वर्षे वयोगटातील ५ व तीस वर्षांवरील २ (म्हणजे आम्ही दोघी) असे शाळेचे पहिले ७ विद्यार्थी. १५ दिवसांत त्यात अजून एका मुलाची भर पडली.

पहिल्यांदा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८:३० ते दुपारी २:३० अशी वेळ होती. पण मुले घरी जायला तयार होईनात. मग आता आठवड्यातून २ दिवस शाळा ४ वाजेपर्यंत तर उरलेले दिवस बहुतेक ३:०० पर्यंत अशी वेळ वाढवली आहे. सकाळी आल्यानंतर त्या दिवशीचे वर्तमानपत्र वाचायचे. त्यावरून इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिक शास्त्र ह्यावर चर्चा करायची, मग साधारण १ तास मैदानावर किंवा पाऊस असल्यास शाळेत खेळायचे किंवा पावसात (दिवसभरात कितीही) भिजायचे, मग नाश्ता करायचा, जेवायच्या वेळेपर्यंत आपल्याला पाहिजे असेल ते  करायचे, (त्यावेळी आम्ही मोठे विद्यार्थी अरविंद गुप्तांची खेळणी बनविणे, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे, वेगळे वेगळे खेळ खेळणे, नाटक करणे, इ. गोष्टीही करतो) त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या प्लानिंग प्रमाणे एकएकटे काम करायचे. त्यात पुस्तक वाचणे, बॉल बरोबर प्रक्टिस, कॅसिओ वाजविणे, झोपणे, हस्तकला, प्रयोग असे काहीही असू शकते. हा आमचा साधारण दिनक्रम असतो.

नाश्ता करताना आम्ही एकमेकांशी मोकळेपणी संवाद साधतो. भावनिक प्रश्न सोडविण्यासाठी, स्वत:शी जोडले जाण्यासाठी सुद्धा ह्या संवादाची गरज असते. आदल्या दिवशी घरी जाऊन काय काय केले, कोणत्या गोष्टी आवडल्या/ कोणाची कोणती गोष्ट अथवा बोलणे आवडले नाही, असे सगळे अगदी छोटी मुलेसुद्धा स्पष्टपणे सांगतात. सेंटरवर कोणताही नियम ठरविताना तो गरज असल्यास सर्वानुमते ठरविला जातो. आणि एकदा ठरला की नियम सर्वांना सारखा. उदा. पहिले काही दिवस ज्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा त्याने जेवावे असे ठरविले होते. पण सगळ्यांच्या डब्यातले अन्न वाटून खाता येत नाही, सारखी जमीन पुसायला लागते, म्हणून सर्वानुमते रोज एकत्र जेवायचे हा नियम झाला. तसेच, जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापले ताट-वाटी-चमचा धुवायचा (वयाने कितीही लहान असलात तरी सर्व नियम सारखे), असे ठरले.

एवढे वाचून तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील. जसे की, आम्ही भाषा, गणित परिसर अभ्यास कधी शिकवतो? तर, आम्ही कधीही काहीही शिकवत नाही. आणि मुले तरीही दिवसभर ह्या गोष्टी शिकतात. उदा. आमच्यातला एक मुलगा म्हणाला मी शाकाहारी आहे. मग आहार, शाकाहार, मांसाहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ अशा चर्चा झाल्यावर आम्ही एक ‘vegetarian egg’ असे सेशन घेतले. अशी सेशन्स अधूनमधून होतात, पण मुलांना उत्सुकता असेल तर त्यांनी सहभागी व्हावे, अन्यथा उठून निघून जावे. कोणीही वाईट वाटून घेत नाही, कोणाचा अपमान होत नाही. कारण हे learning centre आहे. विद्यार्थी ठरवितो की आपल्याला काय आणि कधी शिकायचे.

कोणाला वाटेल, ह्याने मुले हेकेखोर व उद्धट नाही का होणार? तर मला वाटते की साध्या शाळेत जाणारे कोणतेच मूल हेकेखोर वा उद्धट नसते का? असो. आम्हाला वाटते उलट अशा सेंटरमध्ये मुले अधिक समजूतदार व जबाबदार होतात. ह्याचे एक कारण, दर सोमवारी आमचे न्यायलाय भरते. त्यात कोणीही कोणत्याही व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल करू शकते. त्यावर आरोपीला बाजू मांडण्यास वाव असतो, विचार-विनिमय होउन एकमताने न्याय देउन, समज देउन, वेळ पडल्यास शिक्षाही देण्यात येते. वानगीदाखल शिक्षा – रोज पाऊस आल्यावर धावत जाऊन खिडक्या बंद करणे, पाण्याचे पेले रिकामे दिसल्यास पालथे करून ठेवणे, पावसात भिजायला न जाणे, इ.

       ‘सामाजिक जबाबदारी/ बांधिलक’ मुलांना कशी शिकवणार? मुले अनुकरणाने ब-याच गोष्टी शिकतात. आम्ही सेंटरला असणा-या दोघीजणी पर्यावरणाच्या बाबतीत टोकाच्या जागरूक आहोत. शून्य कचरा, शून्य प्रदूषण हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही कागद, प्लास्टिक रिसायकल करायला देतो. आहे त्या वस्तूंमध्ये एक Leaf-composter तयार करून झाडाची सतत पडणारी पाने आणि ओला कचरा ह्यांपासून आम्ही माती बनवितो. प्रत्येक वेळी आठवणीने दिवे-पंखे बंद करतो. शिवाय मुलांना वेगळी-वेगळी खाती १५ दिवसांसाठी दिलेली असतात, उदा. पाणी, वीज, नीटनेटकेपणा, वेळ, अन्न, स्वच्छता, पाहुण्यांचे स्वागत. आलटून पालटून सगळेजण ही कामे करतात. अपव्यय टाळतात. सेंटर बघायला येण्यासाठी खूप जण उत्सुक असतात. त्यासाठी शुक्रवार राखून ठेवण्यात आला आहे. मग अशा पाहुण्यांची ओळख करून घ्यायची, शाळा दाखवायची, पाणी/सरबत द्यायचे अशी कामे स्वागतमंत्री मोठ्या उत्साहाने करतात. ह्या कामांमधून मुले नक्कीच समाजाभिमुख होतात. एवढेच नाही तर इतरांशी बोलण्यास, निर्भिडपणे मत व्यक्त करण्यास सुद्धा तयार होतात.

चपला ठेवायचा स्टॅंड बनविताना
ओल्याकच-यापासून तसेच वाळक्या पानांपासून खतबनविण्यासाठी केलेले composter

एक गंमत. उन्हाळ्यामध्ये एका खिडकीतून सरळ ऊन आत येत असल्याकाराणाने एक खोली खूप तापते असे आमच्या लक्षात आले. उपाय मुलांनीच सुचविला, झाड लावावे. पण ते फूटपाथ वरच लावायला पाहिजे. मग बृ.मु.म.पा. एफ (उ) विभागाच्या कचेरीत भेटायला आम्ही मुलांना घेऊन गेलो. त्यांनी सांगितले, ‘पत्र लिहा’. दोन मुलींनी पत्र लिहिले. मुलांच्या अक्षरातले, पाठको-या कागदावरचे चित्र-विचित्र पत्र घेऊन आमची वरात परत एकदा कचेरीत. त्या बाईंनी “हे काय पत्र आहे?” असा एक कटाक्ष टाकला. आम्ही मुलींकडे बोट दाखविले. त्यांनी कपाळाला आठ्या घालत ते स्वीकारले. मी विचार केला, हे कच-याच्या टोपलीत जाणार. आठ दिवस गेले. परत आठवण करायला आज जाऊ-उद्या जाऊ करताकरता १५ व्या दिवशी गार्डन डिपार्टमेंटचा शिपाईच आमच्या सेंटरला हजर. आम्हाला हर्षवायू. तो असे पत्र लिहिणारे कोणी खरंच वास्तवात आहे का हे पहाण्यासाठी आलेला. आम्हाला बघून त्याने हसून विचारले, तुमचा वृक्षारोपण समारंभ आहे का? आम्ही सांगितले, समारंभासाठी नाही, आम्हाला सावलीसाठी झाड पाहिजे. त्याला त्याच फूटपाथवर अजून ३ जागा दाखविल्या. आम्हाला खात्री आहे बृ.मु.म.पा. नक्कीच पावसाळा संपायच्या आत झाडे लावेल. गंमत म्हणजे, एक ८ वर्षांची मुलगी म्हणाली मला मोठे लिहितात तसे पत्र लिहायला शिकायचेय.

आता कोणी विचारेल की, ‘कधी ह्या सगळ्याची भिती वाटत नाही का?’ तर, माहित नसलेल्या गोष्टींची भिती वाटू शकते. पण हा मार्ग स्वीकारताना इतर पर्यायांपेक्षा हाच पर्याय योग्य आहे ह्याची आम्हाला मुळात खात्री होती. पुढे काय प्रश्न येऊ शकतात ह्याचा  ब-यापैकी अभ्यास झाला होता. त्यामुळे भिती नक्कीच वाटत नाही. मुले तासन्तास एक Oxi-oxi नावाचा निरर्थक खेळ खेळतात. तेव्हा कधी कधी हताश वाटते, ‘ह्यातून ते कधी बाहेर पडणार?’ असे होते. पण गंमत अशी की कोणत्याही वयाचे, कोणतेही (नवीनसुद्धा) मूल ह्या oxi-oxi मध्ये सहज सामावून जाते, त्याअर्थी आम्ही मोठी माणसे तो समजायला असमर्थ असू. शिवाय भाषा प्रगल्भ होणे, भांडणे मिटणे, role play, bonding, stress-bursting असे त्याचे अनेकविध फायदे आहेतच.

ह्या मुलांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न जर कोणी विचारेल तर मुळात हे लक्षात घ्यायला हवे की दोन दशकांपूर्वीची परिस्थिती आणि आताची ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माहितीची दारे खुली आहेत. तंत्रज्ञानाने कुरघोडी केलेली आहे. ह्या मोबाईल आणि सोशल मिडियाने बोकाळलेल्या जगात मुलांना पाठ्यपुस्तकी शिक्षणासाठी मन एकाग्र करणे ही सोपी गोष्ट राहिली नाही. पुस्तकातली माहिती पाठ करून ती ओकण्याच्या पलिकडे जर आता आपण विचार केला नाही तर आपण अगदीच मागासलेले ठरू. शिवाय आपण पाठ्यपुस्तकात शिकलेल्या किती गोष्टी आपल्याला आज आठवतात? जेव्हा काही प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा पाठ्यपुस्तकी अभ्यासाच्या बळावर आपण ते करू शकतो का? हे प्रश्न प्रथम प्रत्येकाने स्वत:ला विचारावेत.

आमचा भविष्याचा विचार असा की, साधारण १२ वर्षांचे झाल्यापासून पुढे त्यांच्या आवडी-निवडी, स्वभावाचे कंगोरे जोखून त्यांच्यासाठी कोणते क्षेत्र अभ्यासाला, पर्यायाने अर्थार्जन करायला योग्य आहे ह्याची चर्चा त्यांच्याशी-पालकांशी सुरू करता येईल. त्यांना जगाचा/ कामाचा अनुभव येण्यासाठी Early apprenticeship program सुरु करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. एक मात्र निश्चित की, मुले जे क्षेत्र निवडतील, ते विचारपूर्वक निवडतील. आणि आवडीच्या गोष्टी मिळण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, करावा लागणारा अभ्यास ह्याची त्यांची संपूर्ण मानसिक तयारी असेल. कारण एकच, हे त्यांच्यावर कोणीही लादलेले नसेल.

जगात शिक्षणाने एक पण पेशाने दुसरे असे कित्येक लोक असतातच ना? शिवाय काहींना वयाच्या चाळीशीत सुद्धा उमगते, की आपण जे करतोय त्यात आपण आनंदी नाही म्हणून. काही जण आपला मार्ग बदलण्याची जोखीम पत्करतात, आणि तर काहींना दुर्दैवाने ती संधीसुद्धा मिळत नाही.

शिवाय इतके म्हणून कोणाला डॉक्टर-इंजिनिअरच व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी शाळेत न जाताही १० वी व १२वी साठी  NIOS वा IGCSE ह्या परीक्षा आहेतच. पण त्या देण्याआधी मुलाला हे तरी पक्के ठाऊक असेल की मला ही परीक्षा का द्यायची आहे?

ह्या आनंदयात्रेला आम्ही सुरुवात तर केली आहे. सध्यातरी आम्हाला सर्वांना विशेषत: मुलांना हे सगळं खूप खूप आवडतंय. ख-या अर्थाने त्यांचे शिक्षण सुरु झालेय असं वाटतंय. आणि त्यांचे हे अनुभवातून शिकत जाणं मला जवळून आणि डोळसपणे अनुभवायला मिळतंय. वाट वेगळी तर जरूर आहे, पण राजमार्ग सोडून न मळलेल्या पायवाटेवरच तर आजूबाजूला बघत, रमत-गमत, जग अनुभवता येतं.